घरमहाराष्ट्रNCP Sign and Symbol: आता वेळ दादांचीच! धनंजय मुंडेंचं ट्वीट चर्चेत

NCP Sign and Symbol: आता वेळ दादांचीच! धनंजय मुंडेंचं ट्वीट चर्चेत

Subscribe

राजकारणातील चाणाक्य म्हणवले जाणारे शरद पवार यांना राजकारणातील सर्वोच्च धक्का बसला असून, अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे.

मुंबई: राजकारणातील चाणाक्य म्हणवले जाणारे शरद पवार यांना राजकारणातील सर्वोच्च धक्का बसला असून, अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. त्यानंतर शरद पवार गट तसंच, अजित पवार गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर आता अजित पवार गटाचे मातब्बर नेते, धनंजय मुंडे यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. (NCP Sing and Symbol Now it s Ajit Pawar Dada s time Dhananjay Munde s tweet in discussion)

धनजंय मुंडे यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिलं की, घड्याळ आणि वेळ दोन्हीही दादांचीच! निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत! या निकालातून आज आमचा निर्णय योग्यच होता, हे पुन्हा एकदा नियतीने सिद्ध केले. पक्षातील सर्व मान्यवर नेत्यांचे व सहकाऱ्यांचे अभिनंदन. हा विजय लोकशाहीचा.

निवडणूक आयोगाने काय म्हटलंय?

  • अजित पवारांकडील पक्ष खरा पक्ष आहे.
  • पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील.
  • दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने
  • 5 आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिलं.
  • उद्या 7 फेब्रुवारीपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह सूचवावं
  • पक्षांतर्गत निवडणूका झाल्या नाहीत.
- Advertisement -

अजित पवारांसोबत कोण?

महाराष्ट्रातील 41 आमदार
नागालँडमधील 7 आमदार
झारखंड 1 आमदार
लोकसभा खासदार 2
महाराष्ट्र विधानपरिषद 5
राज्यसभा 1

- Advertisement -

शरद पवारांसोबत कोण?

महाराष्ट्रातील आमदार 15
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा 3

पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

(हेही वाचा: Jitendra Awhad : आमचं चिन्ह शरद पवार; निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आव्हाडांचे दादांना आव्हान )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -