Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या अट्टहासामुळे गर्दी जमली - जयंत पाटील

निवडणूक आयोगाच्या अट्टहासामुळे गर्दी जमली – जयंत पाटील

Related Story

- Advertisement -

देशातील निवडणुकांमुळे कोरोनाचा फैलाव झाला आहे. यासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरलं पाहिजे, असं मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यावर बोलताना जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाच्या अट्टहासामुळे गर्दी जमली, अशी टीका जयंत पाटील यानी केली. यावेळी त्यांनी पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला.

निवडणुकांचा परिणाम पंढरपूर-मंगळवेढ्यात दिसून येत आहे. तसा पश्चिम बंगलामध्ये देखील दिसून येत आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या तिथे रुग्णांची वाढ होत आहे. खरं तर कोरोना संकटाचं निवडणूक आयोगाने भान ठेवायला पाहिजे होतं. त्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाने जे म्हटलं आहे ते अतिशय योग्य आहे, असं जयंत पाटील म्हणाले. निवडणुका थोड्या पुढे ढकलल्या असत्या तर सरकार चार महिने वाढलं असतं. ममता बॅनर्जी सरकारला चार महिने वाढवून दिले असते तर त्याने एवढ काही झालं नसतं. तसंही आता निवडून त्याच येणार आहेत. तसंच पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल यात शंका नाही, असा विश्वास जयंत पाटील व्यक्त केला.

- Advertisement -

अशाप्रकारची गर्दी करण योग्य नव्हतं. गर्दी कमी करण्यासाठी निवडणूक टाळायला हवी होती ती टाळली नाही. मद्रास उच्च न्यायालयाने जे ताशेरे मारले आहेत आणि जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे. नागरिक एकत्र आले म्हणून कोरोना वाढतो. प्रचार वेळेच्या आत करणं, तेवढ्याच काळात संपवणं…हे निवडणूक आयोगाने दिलेलं आव्हान होतं. या तारखेला निवडणूक आहे, तुम्ही या प्रचार करा नाही तर काहीही करा पण निवडणूक झाली पाहिजे. हा अट्टहास आयोगाने दाखवला नसता तर गर्दी टाळू शकलो असतो. कुंभमेळा टाळता आला असता, निवडणुका टाळता आल्या असत्या. पण आपण त्यात गर्क होतो, असं जयंत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांकडे लक्ष देण्याची गरज नाही

चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका करताना त्यांनी एकतर राजधानी पुण्यात हलवून इथून कामकाज करावं किंवा पुण्याचे पालकमंत्री तरी बदलावेत, अशी टीका केली होती. यावर बोलताना जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला लगावला. अजित पवार यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात करोनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम अजित पवार करत आहेत. पुण्यावरही अजित पवारांचं लक्ष आहे. काही प्रश्न निर्माण झाला तर अजित पवार उपलब्ध असतात आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. अजित पवारांनी पुण्यात येऊन अनेकदा बैठक घेतली आहे. पिंपरीत जाऊन पाहणीही केली आहे. काहीतरी बोलायचं म्हणून चंद्रकांत पाटील बोलत असतात, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisement -