घरमहाराष्ट्र"राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांनी अध्यक्ष पद भूषवावे", जयंत पाटालांची इच्छा

“राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांनी अध्यक्ष पद भूषवावे”, जयंत पाटालांची इच्छा

Subscribe

"लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद त्यांच्याकडे ठेवावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे", अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

मुंबई | “राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांनी अध्यक्षपद भूषवावे”, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली आहे. जयंत पाटलांनी आजच्या पत्रकार परिषदेतूनी शरद पवार (Sharad Pawar) हे निवृत्तीच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही, असेही जयंत पाटील सांगितले आहे.

जयंत पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष करावे, अशी मागणी शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्याबद्दल प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले, “मी महाराष्ट्रात काम करतोय, माझी दिल्लीत ओळख नाही, आणि दुसऱ्या राज्याशी माझा संपर्क देखील नाही. यामुळे लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या व्यक्तीने अध्यक्षपद भूषवावे”, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. जयंत पाटील पुढे म्हणाले, “शरद पवार हे अनुभवी असल्यामुळे शरद पवार हे देशभरात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचे काम करू शकतात. शरद पवारांना एवढ्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास आहे. यामुळेच देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील लोक राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. परंतु, शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर ठाम आहेत. आणि पक्ष पुढे नेहण्यासाठी पाऊल टाकले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.”

- Advertisement -

निवृत्तीच्या निर्णयावर अद्यापही ठाम

शरद पवार यांचे मन वळवण्यासाठी तुम्हाला यश आले का? पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, “शरद पवार हे निवृत्तीच्या निर्णयावर अद्यापही ठाम आहेत. महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी साकडे घातले आहे. देशभरातली विविध नेत्यांकडून शरद पवारांना निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली जात आहे. परंतु, शरद पवार हे त्यांच्या निर्णायवर ठाम आहे’, अशी माहिती जयंत पाटलांनी माध्यमांना दिली आहे.

- Advertisement -

शरद पवारांनी लोकसभा आणि विधानसभेपर्यंत अध्यक्ष रहावे

तुम्ही कार्यकर्त्यांच्या भावना शरद पवारांपर्यंत पोहोचवल्या का? आणि यासंदर्भात शरद पवारांचे काय मत आहे, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, “मी शरद पवार यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांची भावना पोहोचवली आहे. राज्यातील असंख्य कार्यकर्ते, तरुणांना आणि शरद पवारांसोबत काम केले सर्वांनी आग्रह केला आहे की, शरद पवारांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेपर्यंत राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पद त्यांच्याकडे ठेवावे, अशी लोकांची मागणी आहे.”

लोकांना समजावे लागेल

शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर राज्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे, यावर जयंत पाटील म्हणाले, “शरद पवारांच्या निवृत्तीनंतर पक्ष कार्यलयात बरेच राजीनामे आलेले आहेत. तर काही जणांनी मोबाईलवर राजीनामे दिलेले आहेत. शरद पवार नाहीत म्हटल्यावर लोक निराश झालेली आहेत. शरद पवार नसतील तर पक्षात आपल्याला न्याय मिळेल का?, अशी भावना अनेक लोकांनी व्यक्त केली आहे. या भीती आणि नाराजीपोटी त्यांनी राजनामा दिला आहे. त्या सर्वांना आम्हाल समजावे लागेल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -