घरमहाराष्ट्र...त्यांच्याकडे दोन कोटी आले; त्यांची काम झाली असे नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

…त्यांच्याकडे दोन कोटी आले; त्यांची काम झाली असे नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटलांचा विरोधकांना टोला

Subscribe

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयत पाटील हे जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावात पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडी होणार आहे. यासाठी आपल्याला प्रत्येक तालुक्यात सभासद संख्या वाढवावी लागणार आहे. जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पक्षाची सभासद संख्या अधिक असेल, तर आपल्याला त्याठिकाणची जागा मागता येणार नाही. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवावी लागेल, असे वक्तव्य केले.

यावेळी आपली सत्ता नसल्याने खचून जाण्याचे कारण नाही. त्यांच्याकडे दोन कोटी आले, त्यांची काम झाली असे नाही. भविष्यात काही कामे करायची याचे जनतेला जास्त आकर्षण असते. विरोधकांपेक्षा सरस काम करण्यासाठी आपली पक्ष संघटना मजबूत करा. सभासद नोंदणीनंतर आपल्या निवडणुका होणार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

तर उद्धव ठाकरे म्हणतील  ही आमची सीट –

प्रत्येक तालुक्यात किमान २ ते ३ हजार सभासद झाले पाहिजेत. जर २०० आणि ३०० सभासद असले, तर उद्धव ठाकरे म्हणतील  ही आमची सीट आहे, आम्हाला मिळाली पाहिजे, त्यावेळी त्यांना आपली ताकद दाखविण्यासाठी खाली काही तरी काम झाले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर क्रियाशील कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले.

- Advertisement -

राजकीय वर्तुळात चर्चा –

जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीत ज्या पक्षाची ताकद जास्त त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात येतील, असे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे सूत्र ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -