Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र बीडमध्ये मेटेंची राष्ट्रवादीला साथ

बीडमध्ये मेटेंची राष्ट्रवादीला साथ

Subscribe

भाजप सेना महायुतीसोबत राज्यात सत्तेत असणार्‍या शिवसंग्रामने बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पारड्यात आपली ताकद टाकण्याची भूमिका घेतली आहे.मेटेंच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून भाजप आणि विशेषतः पंकजा मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.

बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणूक जाहीर होताच मेटे यांनी राज्यात महायुतीसोबत मात्र बीडमध्ये भाजप विरोधात अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मेटे यांना कानपिचक्या दिल्या होत्या.

- Advertisement -

गेल्या पंधरा दिवसापासून मेटे आणि त्यांचे कार्यकर्ते शांत होते.त्यानंतर बीड येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मेटे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवत लोकसभेत शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला साथ द्यावी आणि पंकजा मुंडे यांची मस्ती जिरवावी असा आदेश दिला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -