Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शरद पवारांवर फडणवीसांनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या 'पूर्ण अभ्यास करायचा...

शरद पवारांवर फडणवीसांनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या ‘पूर्ण अभ्यास करायचा नाही…’

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमात अध्यक्षपादाच्या निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलने केली. अखेर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमात अध्यक्षपादाच्या निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलने केली. अखेर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. फडणवीसांच्या टीकेला आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (ncp supriya sule replied bjp dcm devendra fadnavis over criticism on party chief sharad pawar)

“पुस्तक सगळ्यांनी व्यवस्थित पूर्ण वाचले तर 100 असे उल्लेख आहेत ज्यात उद्धव ठाकरेंचे कौतुक आहे. याला ‘सिलेक्टिव्ह अ‍ॅम्नेशिया’ असे म्हणतात. तो त्यांना सातत्याने होतो. पूर्ण अभ्यास करायचा नाही. कुणीतरी नोट्स काढून दिलेल्या असतात, तेवढ्या आपल्या वाचून दाखवायच्या. दरवेळी माणूस त्यावर पास होत नाही. पूर्ण पुस्तक वाचायचे असते”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्यत्तर दिले.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

“शरद पवारांनी पुस्तकात लिहिले आहे की, राज्यातील घडामोडींची बितंबातमी उद्धव ठाकरेंकडे नसे, जी मुख्यमंत्र्यांकडे असायला हवी होती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यामुळे शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती. त्यांचे कुठे काय घडते याकडे बारीक लक्ष नसे. उद्या काय घडेल याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी होती जी नव्हती. काय पावले उचलावी लागतील, हे ठरवण्याचे राजकीय चातुर्य असायला हवे होते. त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती, असे शरद पवार पुस्तकात म्हणत आहेत”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

- Advertisement -

“एक गोष्ट तर महाराष्ट्रात लक्षातच आली नाही. टीआरपी कसा घ्यायचा त्याचेही आपल्याला प्रशिक्षण घ्यावे लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच माझा राजीनामा परत घेईन. मग मीच माझ्या जागी परत येईन”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.


हेही वाचा – डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या अटकेनंतर प्रथमच भाजपाकडून भाष्य; म्हणाले…

- Advertisment -