Homeमहाराष्ट्रNCP vs Raj Thackeray : राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा नेता संतापला; थेट...

NCP vs Raj Thackeray : राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा नेता संतापला; थेट सल्ला देत केली टीका

Subscribe

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राज ठाकरेंवर टीका करत असतानाच आता विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मिटकरींनी तर राज ठाकरेंना पहाटे लवकर उठून काम करण्याचा सल्ला दिला आहे.

(Amol Mitkari on Raj Thackeray) मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 30 जानेवारी) पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये हा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मिळालेल्या 42 जागांवर शंका उपस्थित केली. ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीत केवळ एक खासदार निवडून आला, त्या अजित पवारांचे 42 आमदार निवडून येणे, हा खरा संशोधनाचा विषय आहे, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. पण त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार संतापले असून ते राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला देत जोरदार टीका केली आहे. (NCP vs Raj Thackeray Statement Amol Mitkari angrily criticized by giving direct advice)

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राज ठाकरेंवर टीका करत असतानाच आता विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मिटकरींनी म्हटले की, राज ठाकरेंना उशिरा उठून चिंतन करण्याची सवय असल्याने विधानसभा निकालाच्या दीड महिन्यानंतर त्यांचे वक्तव्य समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 42 जागा कशा आल्या? याचा शॉक त्यांना दीड महिन्यानी बसला आहे. अजित पवार दिवसरात्र काबाडकष्ट करतात, मेहनत करतात, त्यामुळे विधानसभेत त्यांना 42 जागांपर्यंत मजल मारता आली. राज ठाकरेंनी सुपुत्राचा दारुण पराभव का झाला? आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत? यावर भाष्य करावे. त्यासाठी त्यांनी अजित पवारांसारखे पहाटे पाच वाजल्यापासून कामाला लागले पाहिजे, असा खोचक सल्ला अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना दिला आहे.

हेही वाचा… MNS Raju Patil : खरंच राजू पाटलांना त्यांच्याच गावातून एकही मतं मिळाले नाही का? आकडेवारी काय सांगते

काय म्हणाले होते राज ठाकरे?

भाजपाला 132 जागा मिळाल्या, मागच्या वेळी 2019 मध्ये 105 आणि 2014 मध्ये 122 जागा होत्या. त्यांचे ह गणित आपण समजू शकतो. पण अजित पवार 42, त्यांच्या 4-5 जागा येतात की नाही असे असताना त्यांना इतक्या जागा कशा आल्या. दुसरीकडे अजित पवार असो किंवा छगन भुजबळ असो ज्यांच्या जीवावर सगळे मोठे झाले त्या शरद पवारांच्या केवळ 10 जागा आल्या, हे सर्व न समजण्यापलिकडे आहे. लोकसभेत काँग्रेसचे 13 खासदार निवडून आले. एका खासदाराच्या खाली 6 आमदार येतात. त्यामुळे त्यांचे किमान आमदार निवडून यायला हवे होते, पण त्यांचे फक्त 15 आमदार आले. शरद पवारांचे आठ खासदार आले होते, त्यांचे 10 आमदार आले. पण ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आला त्यांचे 42 आमदार आले, हा खरा संशोधनाचा विषय आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी पक्षाच्या मेळाव्यातून टीकास्त्र डागले.