घरदेश-विदेशनागालॅंडमध्ये शरद पवार 'पॉवरफुल'; सात जागांवर विजय

नागालॅंडमध्ये शरद पवार ‘पॉवरफुल’; सात जागांवर विजय

Subscribe

सोमवारी नागालॅंड विधानसभेसाठी मतदान झाले. हे मतदान शांततेत पार पडले. ८३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नागालॅंड विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. त्यातील ५९ जागांसाठी मतदान झाले. भाजपचे विद्यमान आमदार काझेटो किनीमी यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली. तर भाजपच्या हातात नागालॅंडची सत्ता आली आहे.

नवी दिल्लीः नागालॅंडची सत्ता भाजपकडे गेली असली तरी तेथील निकाल सर्वांना थक्क करणारे आहेत. तेथे राज्यसभा खासदार रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइं) दोन उमेदवार निवडून आले आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सात उमेदवार निवडून आले आहेत. एवढचं काय तर राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला असल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी नागालॅंड विधानसभेसाठी मतदान झाले. हे मतदान शांततेत पार पडले. ८३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नागालॅंड विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. त्यातील ५९ जागांसाठी मतदान झाले. भाजपचे विद्यमान आमदार काझेटो किनीमी यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली. तर भाजपच्या हातात नागालॅंडची सत्ता आली आहे.

- Advertisement -

दरम्यान कसबापेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना निवडून आणण्यासाठी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी कंबर कसली होती. अखेर धंगेकर हे या पोटनिवडणुकीत विजयी झाले. कसब्यात मतमोजणीच्या अगदी सुरूवातीपासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आघाडीवर राहिले. केवळ एखाद-दुसऱ्या फेरीचा अपवाद वगळता हेमंत रासने यांना एकदाही रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध निर्णायक आघाडी घेता आली नाही. विशेष म्हणजे सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधून कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना जास्त मते मिळाली. कसब्यातून आलेला निकाल हा अनपेक्षित असल्याची भावना व्यक्त करण्यात येतेय. हा एक ऐतिहासिक विजय असल्याची भावना कसबाकरांची आहे. धंगेकर यांनी 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. मात्र हा विजय महाविकास आघाडीचा नाही. हा विजय धंगेकरांचा आहे. कारण या निवडणुकीत राहुल गांधी यांचा साधा फोटोही लावला नव्हता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा- रामदास आठवलेंच्या रिपाईंने नागालँडमध्ये उघडले खाते, दोन आमदार विजयी

- Advertisement -

हेही वाचा- पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाचा काळ आता जवळ आला; त्रिपुरा, नागालँड विजयानंतर मोदींचे वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -