घरक्रीडा#Ncp with Champions : राष्ट्रवादीची दिल्लीतील कुस्तीपटूंसाठी मोहीम; जयंत पाटील

#Ncp with Champions : राष्ट्रवादीची दिल्लीतील कुस्तीपटूंसाठी मोहीम; जयंत पाटील

Subscribe

 

मुंबईः दिल्लीतील कुस्तीपटूंचे आंदोलन महाराष्ट्रातील खेळाडूंपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यांच्या या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष #Ncp with Champions ही मोहिम सुरु करणार आहे. या मोहिमे अंतर्गत राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील खेळाडूंना भेटतील. त्यांच्यातील संवाद साधतील. दिल्लीतील आंदोलनाची माहिती खेळाडूंनी देतील. त्यांची आंदोलनाबाबतची प्रतिक्रिया जाणून घेतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी दिली. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून हे फर्मान जारी केले.

- Advertisement -

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सदैव खेळाडूंच्या पाठिशी उभा राहिला आहे. शरद पवार यांचे खेळांडूशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. खो-खो, कबडी, क्रिकेट व कुस्तीसाठी अनेक महत्त्वाच्या योजना शरद पवार यांनी सुरु केल्या. खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. संधी देण्याचं काम केलं. अनेक खेळाडूंना अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मदत केली आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितलं.

जयंत पाटील म्हणाले, खेळाडू देशाचे नाव लौकीक करतात. देशासाठी पदकं घेऊन येतात. मात्र कुस्तीपटूंना वाईट वागणूक दिली जात आहे. कुस्ती महासंघाच्या प्रमुखांनी महिला कुस्तीपटूंचा छळ केला. त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली. एका अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक छळाची तक्रार केली. पोलिसांनी कोणत्याही तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर कुस्तीपटूंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. सर्वाेच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवला. यासाठी खेळाडूंना दिल्लीत आंदोलन करावे लागले.

- Advertisement -

हेही वाचाः“सचिन तुम्ही मूग गिळून गप्प का?”; कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून तेंडुलकरच्या घराबाहेर झळकले बॅनर

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी कुस्तीपटू आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी अत्यंत वाईट वागणूक दिली. त्यांना हिसकावून तेथून बाहेर काढण्यात आलं. या घटनेमुळे देशात अस्वस्थता पसरली आहे. खेळाडूंमध्ये रोष आहे. चिंता आहे. खेळाडूंंचे मनोधैर्य खचले आहे. राष्ट्रवादी नेहमीच खेळाडूंच्या पाठिशी राहिली आहे. खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रवादी एक मोहिम सुरु करत आहे. आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील खेळाडूंची भेट घ्यावी. त्यांची बैठक घ्यावी.  त्यांना दिल्लीतील आंदोलनाची माहिती द्यावी. या आंदोलनाबाबतचे त्यांचे मत जाणून घ्यावे. या संवादाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर #Ncp with Champions या नावाने टाकावेत. ही मोहीम ८ जूनच्या आत आपल्याला संपवायची आहे, असे जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना सांगितले.

IOCचं भारताला आव्हान

महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने उडी घेतली असून समितीनं भारताला थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे भारत या संस्थेची सदस्यता गमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वित्झर्लंडच्या लुसानेमधील IOCचे प्रवक्ते यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. तेव्हा ते म्हणाले की, २८ मे रोजी भारतीय कुस्तीपटूंसोबत ज्याप्रकारचं गैरवर्तन करण्यात आलं. तसेच त्यांना मारहाण करण्यात आली आणि अनेक तास त्यांना अटक करण्यात आली. हे अत्यंत दुर्देवीपणाचं लक्षण आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार IOCने आरोपींच्या निष्पक्षतेबाबत सांगितलं की, या कुस्तीपटूंच्या सुरक्षतेबाबत विचार करण्यात यावा. तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. आयओसीने पीटी उषाच्या अध्यक्षतेखालील भारतीय ऑलम्पिक असोसिएशन (IOA)ला एक विनंती करण्यात आलीय की, भारतीय कुस्तीपटूंच्या सुरक्षतेसाठी तुम्हीसुद्धा एक पाऊल पुढं उचलावं. तुम्ही या प्रकरणी गप्प का आहात?, दोन ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या आणि भारतीय कुस्तीपटूंसोबत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम IOC करण्यात येणार आहे.

आंदोलक कुस्तीपटूंना UWWचा पाठिंबा

अनेक महिन्यांपासून, आम्ही भारतातील परिस्थितीबद्दल चिंतित आहोत, जिथे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध छळ आणि शोषणाचा आरोप करत निदर्शने करत आहेत. आम्ही पाहिले आहे की WFI अध्यक्षांना सुरुवातीला बाजूला केले गेले होते आणि आता ते कुस्तीचे कामकाज पाहत नाहीत, असे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) सांगितले आहे. आम्ही कुस्तीपटूंशी त्यांची स्थिती आणि सुरक्षिततेबाबत बोलू आणि त्यांच्या तक्रारींचे निष्पक्ष आणि न्याय्य निराकरण करण्याच्या बाजूने आहोत. शेवटी आम्हाला पुढील सर्वसाधारण सभेबाबत आयओए आणि तदर्थ समितीकडून माहिती हवी आहे. निवडणुकीसाठी दिलेली 45 दिवसांची मुदत पाळली पाहिजे. त्यातच निवडणुका न घेतल्यास डब्ल्यूएफआय निलंबित केले जाऊ शकते, जेणेकरून खेळाडू तटस्थ ध्वजाखाली खेळतील, असं UWWम्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -