घरताज्या घडामोडीपंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर नमाज, हनुमान चालीसा पठणाची परवानगी द्या; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचे अमित...

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर नमाज, हनुमान चालीसा पठणाची परवानगी द्या; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचे अमित शहांना पत्र

Subscribe

राणा दाम्पत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या नवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरला होता. मात्र शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर केलेल्या आंदोलनानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राणा दाम्पत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या नवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरला होता. मात्र शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर केलेल्या आंदोलनानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याच आता पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाची मागणी केली आहे.

राणा दाम्पत्यांच्या मागणीला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर नमाज, हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा, नवकार या मंत्रांचे पठण करण्याची परवानगी मागितली. उत्तर मुंबई राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा फहमिदा हसन खान यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून वेळ मागितली आहे.

- Advertisement -

पत्रात काय लिहिलंय?

- Advertisement -

“त्या नेहमी आपल्या घरामध्ये हनुमान चालिसा पठण आणि दुर्गा पूजा करतात. मात्र ज्याप्रकारे देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. ते पाहून पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना झोपेतून जागे करण्याची आवश्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण केल्याने रवी राणा आणि नवनीत राणा यांना महाराष्ट्राचा फायदा दिसत आहे. तर देशाचा फायदा करण्यासाठी पंतप्रधान निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा पठण आणि दुर्गापाठ करणे आवश्यक आहे”, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोणषा करणाऱ्या नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच राणा दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.


हेही वाचा – फायर आजींमुळे निदान मुख्यमंत्री घराबाहेर आले; मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -