घरमहाराष्ट्र'ईडी ५ वर्ष झोपा काढत होती का?'

‘ईडी ५ वर्ष झोपा काढत होती का?’

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ईडीला टोला लगावला आहे. महाराष्ट्राचे अस्मिताचा असलेले आदरणीय पवार साहेब यांच्यावरती जर असं राजकारण होतं असेल तर कुणी महाराष्ट्राचा माणूस शांत बसणार नाही, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

आज दुपारी दोनच्या सुमार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. बुधवारी पत्रकार परिषद घेत शुक्रवारी ईडी कार्यालयात जाऊन चौकशीसाठी सहकार्य करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आज ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यात टायर जाळून रस्ता-रोको आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ‘ईडीने हे सूडबुद्धीचे राजकारण केलयं. जर खरंच दोषी होते तर ५ वर्ष ईडी झोपा काढत होती का?’, असा टोला ईडीला लगावला आहे.

हेही वाचाLive Update: शरद पवार यांचा ‘ईडी’ दौरा

- Advertisement -

‘निवडणूकीच्या काळात पवार साहेबांचा महाराष्ट्राचा दौरा सुरू असताना उस्फुर्त असा प्रतिसाद मिळतं होता. या दौऱ्यात तरुणांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांचा पायाखालीच वाळू सरकली. त्यांना घाम फुटलाय म्हणून हे कटकारस्थान चालू आहे’, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. ‘जर तुमचा कारभार पारदर्शक आहे तर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना घरपोहच नोटीस का पाठवल्या? सत्ताधारी घाबरले आहे. म्हणून एवढा पोलिसांचा फाटा तैनात केला आहे. घटनेचा अधिकार होता त्यापद्धतीने तुम्ही कारवाई करू शकला असता, असं राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष सांगितलं.

महाराष्ट्राचे अस्मिताचा असलेले आदरणीय पवार साहेब यांच्यावरती जर असं राजकारण होतं असेल तर कुणी महाराष्ट्राचा माणूस शांत बसणार नाही’, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

- Advertisement -

#Live : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी बातचितशरद पवारांबाबत ईडीने आज सुडबुद्धीने राजकारण केलं. जर दोषी होते तर ५ वर्षे काय झोपलं होतं का ईडी असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांना पाठींबा देण्यासाठी कार्यकर्ते ईडी ऑफिस आणि राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर दाखल झाले आहेत.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 26, 2019

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -