घरमहाराष्ट्रपुण्यात पाणी प्रश्न पेटला; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भाजप खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

पुण्यात पाणी प्रश्न पेटला; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भाजप खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

Subscribe

प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचंही त्यांनी म्हटलं. गिरीष बापटांच्या आरोपांनंतर आता पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी आंदोलन करत गिरीष बापटांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांच्या या गैरसोयीला प्रशासन जबाबदार असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचंही त्यांनी म्हटलं. गिरीष बापटांच्या आरोपांनंतर आता पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी आंदोलन करत गिरीष बापटांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पुण्यातील भाजपा खासदार गिरीष बापट यांच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावेळी गिरीष बापट यांनी पुण्याच्या नागरिकांना फसवलं असुन त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तसंच, ”भाजपा सत्तेत असताना पाण्याचा प्रश्नाची यांना आठवण झाली नव्हती. मात्र सत्ता संपुष्ठात आल्यानंतर पाणी पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत, तसंच, समान पाणीपुरवठा योजना ही तीन वर्षाच पुर्ण होणार होती. मात्र गेल्या ५ वर्षात ही पुर्ण झालेली नाही. या योजनेला पुर्ण होण्यासाठी ७ वर्ष लागणार आहे. परंतु, ही योजना पुर्ण न होण्यामागे भाजपाचं फेल्युअर आहे. तसंच भाजपाचं हे अपयश झाकण्यासाठी गिरीष बापट हे सोंग करत आहे”, असं पुण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं.

- Advertisement -

१४ मार्चला भाजपाची सत्ता संपुष्ठात आली. मागील ५ वर्षे भाजपाची पुणे शहरात सत्ता होती, त्या ५ वर्षात भाजपाला या पुणे शहरात काही करून दाखवता आलं नाही. मागील साडेचार वर्ष गिरीष बापट हे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र तेच गिरीष बापट पुणेकरांना फसवत असल्याचा आरोपही प्रशांत जगताप यांनी यावेळी केला. त्यामुळं आता भाजपाकडून याला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्या, काही दिवसांपुर्वी पुणे शहरातील पाणी वाटपाच्या मुद्द्यांवर खासदार गिरीश बापट यांनी शनिवारी (ता.२६) झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतून प्रशासनाचा निषेध करत सभात्याग केला होता. पुणेकरांना येत्या तीन दिवसांच्या आत समान पाणी वाटप व्हावे. अन्यथा पुणेकरांच्या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारू असा इशाराही बापट यांनी यावेळी दिला. शहरातील पाणी वाटपात गरीब-श्रीमंत असा भेदाभेद केला जात आहे. यानुसार गरिबांना कमी आणि श्रीमंतांना जास्त वेळ पाणी सोडले जात असल्याचा आरोप बापट यांनी केला होता.
महापालिकेवर प्रशासक आल्याने आता पालिका प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे आता आपलेच राज्य, या मानसिकतेतून प्रशासन मनमानी कारभार करू लागले आहे. त्यामुळे शहराचा जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासनाचा निषेध करत असल्याचे बापट यांनी सांगितले.

- Advertisement -

शनिवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत बापट यांनी शहरातील असमान पाणी वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. पण त्यांना यावर समाधानकारक उत्तर न मिळाले नाही. गेल्या चाळीस वर्षांपासून कालवा समितीच्या सभेला उपस्थित राहत आहे. परंतु आतापर्यंत एकदाही सभात्याग करावा लागला नाही. परंतु शनिवारच्या सभेत अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने सभात्याग केल्याचे बापट यांनी सांगितले.


हेही वाचा – नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंच्या घरी ईडीची धाड, फडणवीसांविरोधात केली होती याचिका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -