..तर सदाभाऊ साडी घालून पण नाचतील, राष्ट्रवादीची बोचरी टीका

Sadabhau Khot has alleged that the NCP planned to attack me

अभिनेत्री केतकी चितळेच्या पोस्टवरून राज्यातील वातावरण तापले आहे. यात तिची बाजू घेणार्य सदाभाऊ खोतांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली आहे. केतकीच्या वडिलांनी नसेल इतका त्या पोस्टचा अभिमान सदाभाऊ खोत यांनी असेल, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हान यांनी केली आहे. त्यांनी पुढे आमदारकीसाठी सदाभाऊ खोत देवेंद्र फडणवीसांनी सांगितले तर साडी घालून सिग्नलवर नाचतील, असा टोला सदाभाऊ खोत यांना लगावला आहे.

राष्ट्रवादी टीका करणाऱ्यांना फोडा आणि तोडा असे पत्रक काढते. अमोल मिटकरी ब्राह्मन समाजावर खालच्या भाषेत टीका करतात. मात्र, त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाहीत. गोपीचंद पडळकरांवर हल्ला होतो. दगड टाकावासा वाटतो, त्याचा निषेध का होत नाही, त्यांचा सत्कार होतो, तो अन्याय वाटत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीसांवर, चंद्रकांत पाटलांवर एकरी भाषेत टीका झाली, तेव्हा यांनी नियम घालून घेतले नाहीत, सत्तेत आहेत त्यांना लायसन परमिट आहे का, असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.

यावर भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी या पोस्टचा निषेध केलेला असताना सदाभाऊ खोत यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर राष्ट्रावदीच्या नेत्यांनी सदाभाऊंवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार हे पक्षासाठी आणि राज्यासाठी एवढे काम करत असताना, अशी टीका अयोग्य आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात आली आहे. भाजपा यानिमित्ताने जातीचे राजकारण करत आहे, हे विकृतीचे राजकारण असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे.