शरद पवारांना यूपीए अध्यक्ष करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत प्रस्ताव

sharad pawar

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर पक्षातील नाराज नेत्यांनी काँग्रेस पक्षाची कमान गांधी परिवारापेक्षा दुसऱ्या नेत्याकडे देण्याची मागणी केली आहे. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसने यूपीएची कमान राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मांडला आहे. यापुर्वीसुद्धा अनेक नेत्यांनी यूपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना करावे अशी मागणी केली होती परंतु पहिल्यांदाच पार्टीशी संबंधित बैठकीत असा प्रस्ताव करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी म्हटलं आहे की, सध्याच्या परिस्थितीत शरद पवार यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे. जो देशातील बंधुभाव पुन्हा प्रस्थापित करु शकतील. शरद पवार असे नेते आहेत ज्यांचे देशातील सर्व प्रादेशिक पक्षांसह काँग्रेससोबतसुद्धा चांगले संबंध आहेत.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची देशाला गरज आहे. देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत नाही आहे. जे शरद पवार यांच्यामुळे एकत्र येतील असे युवा संघटनेचे अध्यक्ष धीरज शर्मा म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीचे समर्थन करत एनसीपी नेता माजिद मेनन यांनी म्हटलं आहे की, देशातील सगळ्यात मोठी पार्टी असूनही अंतर्गत वादामुळे काँग्रेस यूपीएचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम नाही. २०२४ लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. यामुळे काँग्रेसने युपीएची कमान शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे देण्याची गरज आहे.

मोदींना काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत भाजपची सत्ता हवी – पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपशासित राज्य सोडून सर्व राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे नेत्यांना त्रास देण्यातयेत आहे. एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेनासह प्रत्येक नेत्याविरोधात काही ना काही कारवाई सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकच विचार आहे. लोकांची इच्छा काहीही असो त्यांना फक्त काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपची सत्ता हवी असे शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांची सुट्टी कायम