Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीनिफाडमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विजयी

निफाडमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विजयी

Subscribe

शिवसेना उबाठाचे अनिल कदम यांचा पराभव

निफाड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाने विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने अनिल कदम यांना उमेदवारी दिली. निफाड विधानसभा मतदारसंघात दिलीप बनकर यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल कदम यांना पराभवाचा सामना करावा लागला.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत निफाडची लढत ही राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विरुद्ध शिवसेनेचे अनिल कदम यांच्यात झाली होती. अनिल कदम यांना 90 हजार 65 मतं मिळाली आणि ते विजयी झाले. तर दिलीप बनकर यांना 56 हजार 920 मतं मिळाली होती. यानंतर 2014 मध्ये पुन्हा एकदा निफाडमध्ये दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम यांचा सामना झाला. या निवडणुकीत अनिल कदम यांना 78 हजार 186 मतं मिळाली तर दिलीप बनकर यांना 74 हजार 265 मतं मिळाली. अवघ्या 3 हजार 921 मतांनी अनिल कदम यांचा निसटता विजय झाला होता. यानंतर दोन पराभवांचा वचपा दिलीप बनकर यांनी भरुन काढला. राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या बनकरांना 2019 च्या निवडणुकीत 96 हजार 354 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या अनिल कदम यांना 78 हजार 686 मतं मिळाली. निफाड विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत पहायला मिळाली. मात्र, दिलीप बनकर 28 हजार 697 मतांनी विजयी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -