राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठीचा तिढा अखेर सुटला!

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत अखेर वादावर तोडगा निघाला आहे.

sharad pawar, priyanka chaturvedi, rajiv satav
राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठीचा तिढा अखेर सुटला!

महाविकास आघाडीमधील राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठीचा तिढा अखेर सुटला आहे. चौथ्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. मात्र, हा आग्रह सोडल्यामुळे चौथ्या जागेचा प्रश्न सुटला आहे. चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या चार जागांपैकी शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीकडून शरद पवार यांनी अर्ज भरला. शरद पवारांसोबत फौजिया खान देखील अर्ज भरणार होत्या. मात्र, चौथ्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्यामुळे त्यांनी अर्ज भरला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत अखेर वादावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे चौथ्या जागेसाठी आज फौजिया खान अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून फौजिया खान आज फॉर्म भरणार आहेत.


हेही वाचा – आर्सेनालच्या मुख्य प्रशिक्षकांना करोनाची लागण


राज्यसभेच्या सात जागंसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी चार जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत. तर उर्वरित तीन जागा आम्हाला मिळतील असा दावा भाजपने केला आहे.