घरमहाराष्ट्रजुळ्या बहिणींशी लग्न केल्याने नवरदेव अडचणीत, बेकायदा विवाहाअंतर्गत गुन्हा दाखल

जुळ्या बहिणींशी लग्न केल्याने नवरदेव अडचणीत, बेकायदा विवाहाअंतर्गत गुन्हा दाखल

Subscribe

जुळ्या बहिणींशी लग्न बेकायदा असल्याचं सांगत माळेवाडीतील राहुल फुले या व्यक्तीने अतुल अवताडेविरोधात फिर्याद दिली होती. याप्रकरणी अकलूज पोलिसांनी अतुल अवताडेविरोधात NCR (Non-Cognizable Case) प्रकारात गुन्हा दाखल केला आहे.

सोलापूर – माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे एका लग्नाची भन्नाट गोष्ट सर्वांनीच पाहिली. आय टी इंजिनिअर असलेल्या जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत लग्न केल्याची बातमी काल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. मात्र, जुळ्या बहिणींशी लग्न करणे संबंधित नवरदेवाच्या अंगलट आले आहे. अतुल अवताडे असं या नवरदेवाचं नाव असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या ४९४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुळ्या बहिणींशी लग्न बेकायदा असल्याचं सांगत माळेवाडीतील राहुल फुले या व्यक्तीने अतुल अवताडेविरोधात फिर्याद दिली होती. याप्रकरणी अकलूज पोलिसांनी अतुल अवताडेविरोधात NCR (Non-Cognizable Case) प्रकारात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

अतुल अवताडे याचे २ डिसेंबर रोजी जुळ्या बहिणींशी लग्न झाले. रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींसोबत त्याने एकाच मांडवात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची ही भन्नाट गोष्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चिली गेली. असंख्य मिम्स एका दिवसात तयार केले गेले. एकीकडे या लग्नावरून हास्यकल्लोळ सुरू असताना दुसरीकडे नवरदेव अडचणीत आला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – आज बिनधास्त फिरा, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक नाही!

- Advertisement -

कसं जुळलं लग्न?

अतुल अवताडे हा तरुण मुळचा माळशिरस तालुक्यातील अकलूज गावचा. त्याचा रिंकी आणि पिंकी पाडगावकर यांच्या कुटुंबियांशी संपर्क आला. रिंकी आणि पिंकीच्या वडिलांचे काहीच दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे या दोघीही आईसोबत राहत होत्या. पाडगावकर कुटुंबातील आजारपणात अतुल अवताडे याने खूप मदत केली होती. त्यामुळे त्यांच्यातील संपर्क वाढत गेला. दोन्ही कुटुंबात जवळीकी वाढल्याने या कुटुंबाशी त्याने सोयरिकी जुळवण्याचा निश्चय केला.

रिंकी आणि पिंकी या जन्मतः एकत्र असल्याने त्यांना कायम एकत्र राहायचं आहे. दोघीही उच्चशिक्षित असून आय.टी इंजिनिअर आहेत. त्या अजूनही एकाच ताटात जेवतात इतका या दोघींचा एकमेकींवर जीव आहे. त्यामुळे त्यांनी एकाच मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा विचित्र निर्णय आधी घरच्यांना पटला नाही. परंतु, घरच्यांनी विवाहाला मान्यता दिली. अखेर, २ डिसेंबर रोजी अकलूजच्या वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेलमध्ये या तिहेरी विवाह संपन्न झाला.

हेही वाचा – आता प्रशासकीय कामकाज ‘पेपरलेस’ होणार, ‘ई-ऑफिस’ प्रणालीला सुरुवात करणार; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -