घरमहाराष्ट्र'कांद्याला अनुदान द्या', लासलगाव शिष्टमंडळाची मागणी

‘कांद्याला अनुदान द्या’, लासलगाव शिष्टमंडळाची मागणी

Subscribe

नाशिकच्या लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक कृषीउत्पन्न बाजार समितीच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय कृष्टीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.

उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने नाशिकमधला शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जुलै २०१८ मध्ये उन्हाळ कांदा हा कमीत कमी ४०० रुपये आणि जास्तीत जास्त १५५२ रुपये तर सरासरी ११५१ रुपये प्रतिक्विंटलने विकला गेला. आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी २०१ रुपये जास्तीत जास्त ६९० रुपये तर सरासरी ३७० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला असून केंद्र सरकारने यावर त्वरित उपाययोजना करून धंद्याला अनुदान जाहीर करावे, यासाठी निफाडचे आमदार अनिल कदम, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर, लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर तसेच चांदवड बाजार समितीचे शिष्टमंडळ यांनी केंद्रीय कृषि मंत्री राधा मोहन सिंग यांची आज दिल्लीमध्ये भेट घेतली.

दीड लाख मेट्रिक टन कांदा पडून!

लासलगाव सहा जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. दररोज लासलगाव बाजार समितीमध्ये सहा ते सात हजार क्विंटल कांद्याची तर उन्हाळ कांद्याची १६ ते १७ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होत असून, साधारणतः एक ते दीड लाख मेट्रिक टन उन्हाळ कांदा अजूनही शिल्लक आहे. सध्या देशात आणि देशाच्या बाहेर नवीन लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याला मागणी कमी असल्यामुळे शेतकरी वर्गाला मिळेल त्या भावात कांदा विकण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

नैराश्यातून शेतकऱ्यांची आत्महत्या

कांदा हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नगदी पिक असल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे सगळे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने बळीराजा कर्जबाजारी झाला आहे. सध्या कांद्याला मिळणा-या भावात उत्पादन खर्च निघणे दुरापास्त झाल्याने दुष्काळी परीस्थितीत शेतकरी होरपळून निघत आहे. ८ ते ९ महिने उन्हाळ कांदा साठवणूक करून त्याच्या देखभालीचा खर्चही भरून निघत नसून उलट ज्या काळात साठवणूक केली त्याहीपेक्षा कमी भाव कांद्याला मिळत असल्याने कांदा उत्पादकांमध्ये कमालीचे नैराश्य आले असून गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.

कांद्याला समर्थन किंमत हवी

यापुढील काळात परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून कांदा भावातील घसरण रोखण्यासाठी केंद्र शासनाने तातडीने उपाययोजना करावी. ज्याप्रमाणे मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी समर्थन किंमत जाहीर केली त्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा समर्थन किंमत जाहीर करावी किंवा कांद्याला १ हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे, अशी मागणी लासलगाव आणि चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे.


हेही वाचा – कांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देणार – सदाभाऊ खोत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -