घरमहाराष्ट्रनागपूरNCRB रिपोर्ट कसा वाचावा याचं प्रशिक्षण विरोधी पक्षाला देण्याची आवश्यकता; देवेंद्र फडणवीस...

NCRB रिपोर्ट कसा वाचावा याचं प्रशिक्षण विरोधी पक्षाला देण्याची आवश्यकता; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Subscribe

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला तसेच पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना खात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, उपराजधानीमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बट्टाबोळ झाला आहे. राज्यात शांतताभंग होत असल्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. याच आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Need to train opposition parties on how to read NCRB reports Devendra Fadnavis criticism)

हेही वाचा – Devendra Fadnavis : विरोधी पक्षाने झोपेत पत्र लिहिलं का? विदर्भ, मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेख नाही

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुन्ह्यांच्याबाबत लोकसंख्येचा विचार करता आपण आठव्या क्रमांकावर आहोत. खूनांच्या बाबतीत महाराष्ट्र 17 क्रमांकावर आहे. महिलांसंबंधीत होणाऱ्या घटनांमध्ये महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. बलात्कार हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे, परंतु यामध्ये महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर आहे. अपहरणाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे, याबाबतचं प्रशिक्षण देण्याची आवश्यकता विरोधी पक्षाला आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ज्यांनी नागपुरात अधिवेशन घेतलं नाही, ते सांगत आहेत की, सरकार 10 दिवस अधिवेशन घेत आहे. परंतु त्यांना माझा प्रश्न आहे की, आम्ही रोज म्हणायचो नागपूरचे अधिवेशन घ्या, पण नागपूर अधिवेशन व्हायचं नाही. आम्ही तर बीएससीमध्ये देखील सांगितलं की, 19 तारखेला आपण पुन्हा बीएससी घेऊ आणि त्या दिवशी किती कामकाज आपल्याला झाला आहे आणि किती व्हायचंय, असा सगळा अंदाज घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय करू. त्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षाने पहिल्यांदा आरशात पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे, असा टोलीही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – आम्ही दिल्लीत गेल्यावर ‘कठपुतली’ म्हणणाऱ्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाकही…; एकनाथ शिंदे कडाडले

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

सरकारवर टीका करताना विजय वडेट्टीवारी म्हणाले की, महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये म्हणजेच नागपूरमध्ये अधिवेशन होत आहे. पण या उपराजधानीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा संपूर्ण बट्टाबोळ झालेला आहे, असा आरोप करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, नागपूरची ओळख संत्रा नगरी म्हणून होती, पण आता चोरांची नगरी म्हणून म्हणावं का? अशी प्रकारची स्थिती या नागपूर शहरामध्ये सुरू आहे. दररोज साधारणत: 112 घडफोड्याच्या घटना विदर्भासह नागपूरमध्ये होत आहे. याचाच अर्थ या राज्याचं सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शांतताभंग होत असल्याचे दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -