घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात राजकीय बदल होऊ शकतात पण.., नीलम गोऱ्हेंचा दावा

महाराष्ट्रात राजकीय बदल होऊ शकतात पण.., नीलम गोऱ्हेंचा दावा

Subscribe

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अद्यापही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाहीये. पुढील दहा दिवसांत यावर निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यातील सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रात कोणतेही राजकीय बदल होऊ शकतात, असा दावा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलाय.

नीलम गोऱ्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील विधिमंडळ सदस्यांच्या केसचा निकाल सर्वोच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. या केसची सुनावणी कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यावर आताच बोलणे म्हणजे न्यायव्यवस्थेवर दबाव आणल्यासारखे होईल, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

- Advertisement -

महाविकास आघाडीचे शरद पवार, संजय राऊत हे शिल्पकार असून त्याचे सारथ्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. परिस्थितीनुसार आघाडी होतात आणि परिस्थितीनुसार त्या बदलतात. त्यामुळे स्वतःची दिशा बदलण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे, असंही गोऱ्हे म्हणाल्या.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र ,सध्या एका खुर्चीत एक माणूस बसला असताना मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा अधिक कशी होऊ शकते?, पवारांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच यावर संजय राऊतांनी देखील स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी यामध्ये कोणताही वाद वाढवण्याचा प्रयत्न करू नये, असं मत गोऱ्हेंनी व्यक्त केलं.

- Advertisement -

हेही वाचा : खारघर दुर्घटनाप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -