Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी NEET 2021 परीक्षेची तारीख जाहीर

NEET 2021 परीक्षेची तारीख जाहीर

Related Story

- Advertisement -

National Eligibility cum Entrance Test (NEET) २०२१ ची परीक्षा येत्या १२ सप्टेंबर रोजी देशात एकाचवेळी होईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केली. विद्यार्थ्यांसाठी बहुप्रतिक्षित असा निर्णय नव्या शिक्षणमंत्र्यांनी या खात्याची जबाबदारी स्विकारताच घेतला आहे. NEET परीक्षेच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवार १३ जुलै सायंकाळी ५ जुलैपासून सुरूवात होणार आहे. विद्यार्थी https://ntaneet.nic.in/Ntaneet/Welcome.aspx या संकेतस्थळावर परीक्षेचा अर्ज भरू शकतात.

याआधी १ ऑगस्ट रोजी परीक्षा होईल अशी अपेक्षा होती. पण या परीक्षेचे अर्ज प्रक्रियेला अद्यापही सुरूवात करण्यात आली नव्हती. कोरोनामुळे ही परीक्षा आतापर्यंत रखडली होती. येत्या दिवसांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही परीक्षा महत्वाची अशी आहे. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील पदवी शिक्षण, डेंटल कोर्सेस यासारख्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण करण्याची अट ठेवण्यात आली आहे. परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेसोबतच या परीक्षेचा पॅटर्नही घोषित होण्याची शक्यता आहे. JEE सारखीच ही NEET 2021 परीक्षेचा पॅटर्न असेल असे अपेक्षित आहे. या परीक्षेशी संबंधित एका माहिती पुस्तिकाही जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -