घरताज्या घडामोडीNEET Exam : उद्या होणार नीट परीक्षा; ११ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

NEET Exam : उद्या होणार नीट परीक्षा; ११ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

Subscribe

काही दिवसांपूर्वी नाशिक‎ जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर‎ झाला. त्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग‎ एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या‎ प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल‎ एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (NEET) ही‎ प्रवेश परीक्षा होणार आहे. नीट परीक्षा मराठी, हिंदी व‎ इंग्रजी यांसह एकूण १३ भाषांमध्ये होणार आहे.‎ नीट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार‎ असून देशभरातील विविध शहरांतील‎ केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा होणार‎ आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिक‎ जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर‎ झाला. त्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग‎ एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या‎ प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल‎ एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (NEET) ही‎ प्रवेश परीक्षा होणार आहे. रविवार (७ मे) ही परीक्षा होणार असून शहरातील २० परीक्षा‎ केंद्रांवर ११ हजार विद्यार्थी परीक्षा देणार‎ असल्याची माहिती समोर येत आहे. (NEET exam will be held tomorrow 11 thousand students will give the exam)

नीट परीक्षा मराठी, हिंदी व‎ इंग्रजी यांसह एकूण १३ भाषांमध्ये होणार आहे.‎ नीट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार‎ असून देशभरातील विविध शहरांतील‎ केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा होणार‎ आहे. या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी‎ परीक्षा देणार असल्याने परीक्षेच्या‎ पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली‎ जाणार आहेत.

- Advertisement -

परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी‎ मेटल डिटेक्टरद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी‎ झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे. तसेच‎ विद्यार्थ्यांना कोणतेही इलेक्ट्रॉनिक‎ साहित्य घेऊन जाण्यास बंदी असेल.‎ सकाळी ११.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी‎ परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय, परीक्षेला जाताना लांब‎ बाहीचा शर्ट, बुट, कोणतेही दागिने, कानातील, हातातील‎ दागिने, मोबाइल, बॅग, ट्रान्सपरंट नसलेल्या वस्तूंना बंदी‎ आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमबीबीएस,‎ बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस,‎ बीयूएमएस आणि बीएचएमएस या‎ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्तरित्या नीट‎ परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे‎ अखिल भारतीय स्तरावरील महत्वाच्या परीक्षांचे‎ आयोजन केले जाते.

- Advertisement -

नीट परीक्षेचे वेळापत्रकासह अभ्यासक्रम,‎ पात्रता, परीक्षा केंद्र या विषयीची सर्व माहिती‎ https://neet.nta.nic.in या संकेतस्थळावर‎ उपलब्ध करून देण्यात आली आहे.‎ परीक्षेसाठी हॉल तिकीट एनटीएच्या‎ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले‎ आहे.‎

या नियमांसह परीक्षा १३ भाषांमध्ये‎ होणार

  • १८० प्रश्नांसाठी एकूण ७२० गुण‎ वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष‎ प्रवेशासाठी नीट परीक्षा अनिवार्य आहे.
  • नीट‎ परीक्षा लेखी स्वरूपात घेतली जाते.
  • दुपारी २ ते‎ ५.२० या वेळेत नीट परीक्षा होईल.
  • या परीक्षेत‎ फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी या‎ चार विषयांवर एकूण १८० प्रश्न विचारले‎ जातील.
  • एकूण ७२० गुणांसाठी ही परीक्षा‎ होईल.
  • एमसीक्यू पद्धतीने विभाग ए आणि बी‎ अशा दोन सत्रात प्रश्नांची विभागणी असेल.‎
  • प्रत्येक प्रश्नाला चार गुण असतील.
  • चुकीच्या उत्तराला १ गुण कमी होईल.
  • तीन तास‎ २० मिनिटांचा वेळ असेल.‎

हेही वाचा – J&K : बारामुल्ला येथील चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -