घरCORONA UPDATEमरकजमध्ये सहभागी झालेल्या ३२ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह!

मरकजमध्ये सहभागी झालेल्या ३२ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह!

Subscribe

सध्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलीगी जमातीच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक लोक यामध्ये सहभागी होते. त्यासर्वांना सध्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. पण सोलापुरकरांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी असलेले सोलापूर शहर आणि जिल्हातील लोकांपैकी ३२ जणांची चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याच समोर येत आहे.

राजधानी दिल्लीत झालेल्या या धार्मिक कार्यक्रमात सोलापुरातील अनेक लोक उपस्थित होते. याबाबत पोलीस प्रशासनाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर या सर्व लोकांची यादी घेऊन शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर आढळून आलेल्या लोकांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. सोलापुरात अजून एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.

- Advertisement -

आतापर्यंत राज्यातील कोरोनाग्रस्तांचा ३३५ वरून ३३८वर पोहोचला आहे. पुण्यात दोन आणि बुलढाण्यात एक नवा रुग्ण आढळला आहे. बुलढाण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. आता बुलढाण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५वर तर पुण्यातील ५२वर पोहोचली आहे.

- Advertisement -

आतापर्यंत राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी

मुंबई – १८१ 

पुणे (शहर आणि ग्रामीण भाग) – ५२ 

सांगली – २५

मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा व जिल्हे – २ 

नागपूर – १६

अहमदनगर – ८

यवतमाळ – ४

बुलढाणा – ५

सातारा, कोल्हापूर प्रत्येकी – २

औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी -१

इतर राज्य – गुजरात १

एकूण ३३५ 


हेही वाचा – तबलीगी जमातमधील लोक क्वारंटाईन वार्डमध्ये डॉक्टरांवर थुंकले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -