घरताज्या घडामोडीआषाढी वारीसाठी तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात हलगर्जीपणा

आषाढी वारीसाठी तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात हलगर्जीपणा

Subscribe

विठ्ठल मंदिर समितीने लाडू बनवण्याचे काम सध्या सांगोला रोडवरील एका शेडमध्ये सुरू आहे. यंदा ८-१० लाख लाडू बनवण्यात येणार आहेत. मात्र हे लाडू बनवताना स्वच्छतेची योग्य काळजी घेतली जात नसल्याचं निर्दशनास आलं आहे

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व धार्मिक स्थळांवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे पंढरपूरात आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. आषाढी एकादशीसाठी लाखो वारकऱ्यांनी संतांच्या पालख्यांसोबत प्रस्थान केलेलं आहे. तसेच पंढपूरातही पालख्यांचे आणि वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी झाली आहे. यामध्ये विठोबाच्या प्रसादासाठी लाडू देखील विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

लाडू बनवताना होतोय हलगर्जीपणा
विठ्ठल मंदिर समितीने लाडू बनवण्याचे काम सध्या सांगोला रोडवरील एका शेडमध्ये सुरू आहे. यंदा ८-१० लाख लाडू बनवण्यात येणार आहेत. मात्र हे लाडू बनवताना स्वच्छतेची योग्य काळजी घेतली जात नसल्याचं निर्दशनास आलं आहे. हे लाडू बनवताना तेथील महिलांच्या हातात हातमोजे घातले नसल्याचे दिसून आले. यामुळे नक्कीच भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

सध्या समितीच्यावतीने मंदिर परिसरामध्ये अनेक ठिकाणी लाडू विक्रीचे केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या लाडू विक्री केंद्रावर लाडू प्रसाद खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. आता २ लाडूंची किंमत आता १५ ऐवजी २० करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाविकांच्या आरोग्यासोबतच खिशालाही फटका बसणार आहे.

 


हेही वाचा :Ashadhi Wari 2021 : यंदाच्या आषाढी वारी सोहळ्य़ावर बंदी नको निर्बंध मान्य- वारकरी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -