एका बाईसाठी नेहरुंनी देशाची फाळणी केली; सावरकरांचे नातू रणजीत यांचा गंभीर आरोप

nehru allowed the partition of india because of a woman now savarkar grandson has made serious allegations

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. यावरून भाजप, मनसे आणि शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली. अनेक ठिकाणी आंदोलने, मोर्चे निघाले. मात्र राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे खंडन करत वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी एका बाईसाठी भारताची फाळणी केल्याचा गंभीर आरोप रणजीत सावरकर यांनी केला आहे. इतकेच नाही तर नेहरूंनी 12 वर्षे भारताची गुप्त माहिती इंग्रजांना दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी राहुल गांधी यांना या आरोपांचे उत्तर देण्याचा आवाहन केले आहे. रणजीत सावरकर शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंवर आरोप करताना ते म्हणाले की, भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली होती. ते 12 वर्षे भारताची गुप्त माहिती इंग्रजांना देत होते. पंडित नेहरू आमि एडविवा यांच्यातील पत्रव्यवहार ब्रिटीशांकडून मागवून तो जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, ज्या नेत्याला आपण चाचा नेहरू म्हणतो त्यांनी देशाचा विश्वासघात कसा केला हे संपूर्ण देशाला कळेल. पंडित नेहरू 9 मे ते 12 मे 1947 या काळात एकटेच शिमल्याला गेले होते. चार दिवस ते कुटुंबासह तेथेच राहिले. एडविना यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेल्या पत्रात पंडित नेहरूंना माझे पाहुणे म्हणून निमंत्रित केल्याचा उल्लेख आहे. तसेच ते खूप व्यस्त असल्याने नर्व्हस ब्रेक डाउन जवळ येत आहे. त्यांनी माझ्यासोबच चार दिवस घालवले आणि ते माझे चांगले मित्र झाले आहे, आमची मैत्री दीर्घकाळ टिकेल. यावेळी पंडित नेहरू माझ्या ताब्यात आल्याचे एडविना यांनी म्हटल्य़ाचा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे.

रणजीत सावरकर पुढे म्हणाले की, पंडित नेहरूंनीच माउंटबॅटन यांना व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले होते, यावेळी बलवंत सिंह म्हणाले होते की, व्हाईसरॉय असल्याने ते पाकिस्तानात सैन्य पाठवू शकत नाही. यादरम्यान 20 हजार भारतीय तरुणींचे अपहरण करत त्यांना पाकिस्तान ठेवण्यात आले होते. यावेळी माउंटबॅटन यांनी लिहिले की, भारतीय नेत्यांना हे हत्याकांड पाहून काय करावे हे समजत नाही, म्हणून मी ताबा घेतला. यावेळी माउंटबॅटन यांनी असेही लिहिले की, माउंटबॅटनने भारत सोडल्यानंतर नेहरूंनी त्यांना 12 वर्षे दररोज त्यांचे अहवाल पाठवले. जे गुप्तचर यंत्रणांचे मोठे अपयश आहे.

यावेळी नेहरूंना हनीट्रॅपमध्ये फसवल्याचाही गंभीर आरोप रणजीत सावरकर यांनी केली आहे. हा गुन्हा आहे. याआधीही अनेकांना असे पकडण्यात आले, शिक्षाही झाली, पण नेहरूंबद्दल कोण बोलणार? राहुल गांधींनी 12 वर्षोंच्या हनीट्रॅपचे उत्तर द्यावे. या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे.


सातारा महापालिका निवडणुकीवरून उदयनराजेंचा शिवेंद्रसिंह राजेंवर पलटवार; म्हणाले…