फक्त यशोमती ठाकूरच का? भाजप नेत्यांनीही केली होती ‘तशी’ वक्तव्य!

यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर नेटिझन्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Vatsalya activities will be implemented across the state said yashomati thakur
राज्यभरात ‘वात्सल्य’ उपक्रम राबवणार; यशोमती ठाकूर यांची माहिती

रविवारी दिवसभर जशी चर्चा महाविकासआघाडीच्या बहुचर्चित खातेवाटपाची होती, तशीच ती होती काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याची. ‘मी आत्ताच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजून खिसा गरम व्हायचा आहे’, असं वक्तव्य महाविकासआघाडीतल्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आणि त्यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. त्यांच्या या वक्तव्यानंतर लागलीच कट्टर शिवसेना विरोधक असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दंड थोपटले आणि थेट निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांच्याकडे तक्रार दाखल केली. यशोमती ठाकूर यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर भलतंच व्हायरल होऊ लागलं असून नेटिझन्स त्यांना चांगलेच ट्रोल करू लागले आहेत.

नक्की काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

एका ट्वीटर अकाऊंट वापरकर्त्याने यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. ‘आपलं सरकार नव्हतं. आत्ताशी मी फक्त शपथ घेतलीये. खिसे गरम व्हायचे आहेत अजून. मला जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की काही जमलं नाही अजून मॅडम. जे आपल्या विरोधात आहेत, त्यांचे खिसे बंबाटच भरले आहेत. ते खिसे रिकामे करायला आपल्या घरी आले, तर त्यांना नकार देऊ नका. घरी आलेल्या लक्ष्मीला कोण नाही म्हणतं?’ असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान जाहीर सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं.

त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे मुंबईतील नेते किरीट सोमय्या यांनी लागलीच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. ‘मंत्री यशोमती ठाकूर या प्रचारादरम्यान लोकांना भ्रष्ट मार्गांसाठी उद्युक्त करत असल्याचं दिसून आलं असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी’, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

वास्तविक यशोमती ठाकूर यांच्याआधी देखील अनेकदा नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य केली आहेत. रावसाहेब दानवेंनी २०१६मध्ये पैठणमध्ये असंच वक्तव्य केलं होतं.

त्याआधी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी देखील २०१४च्या निवडणुकांसाठीच्या प्रचारादरम्यान अशाच स्वरूपाचं विधान केलं होतं.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर नेटिझन्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.