घरताज्या घडामोडीदेशात 12 हजार 751 नवीन कोरोनाबाधितांची नोंद; बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

देशात 12 हजार 751 नवीन कोरोनाबाधितांची नोंद; बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आशातच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात गेल्या दोन महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आशातच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात गेल्या दोन महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात गेल्या 24 तासांत 12 हजार 751 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यासोबतच सक्रिय रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने घट होताना पाहायला मिळत आहे. (New 12751 corona patients in India)

देशभरात सध्या 1 लाख 31 हजार 807 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात आजपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 5 लाख 26 हजार  772 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा दर 0.30 टक्के आहे. त्यामुळे देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांचा दर 98.51 टक्के आहे.

- Advertisement -

गेल्या 24 तासांत 16 हजार 412 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गावर मात केलेल्यांची संख्या 4 कोटी 35 लाख 16 हजार 71 इतकी झाली आहे. तसेच, सोमवारी दिवसभरात देशात 16 हून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 005 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी राज्यात एकूण 1 हजार 044 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या एकूण 11 हजार 968 इतके रुग्ण सक्रिय आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईमध्ये आहे. शिवाय, चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईमध्ये 2 हजार 977 इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 2 हजार 726 सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

सोमवारी मुंबईत 407 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 163 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11 लाख 05 हजार 317 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 660 झाली आहे. सध्या मुंबईत 2 हजार 977 रुग्ण आहेत.


हेही वाचा –  सरकार स्थापनेच्या 39 व्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार; राजभवनात होणार शपथविधी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -