देशभरात शनिवारी 14 हजार 92 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या आलेखात दिवसेंदिवस चढ-उतार होत आहेत. कोरोना वाढ असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. शनिवारी देशभरात 14 हजार 92 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत 1 हजार 723 रुग्णांची घट झाली आहे.

coronavirus 3

कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या आलेखात दिवसेंदिवस चढ-उतार होत आहेत. कोरोना वाढ असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. शनिवारी देशभरात 14 हजार 92 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत 1 हजार 723 रुग्णांची घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे. शुक्रवारी देशात 15 हजार 815 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. (New 14092 corona patients in coronavirus)

देशभरात 3 लाख 81 हजार 861 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 88 कोटींहून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. देशात शनिवारी दिवसभरात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोनाबाधितांपेक्षा जास्त आहे. शनिवारी 16 हजार 454 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 36 लाख 9 हजार 566 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटली असून, देशात 1 लाख 16 हजार 861 कोरोना रुग्ण आहेत. तसेच, शनिवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 28 लाख 1 हजार 457 डोस देण्यात आले आहेत.

देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मता दर 3.69 टक्के, तर आठवड्याचा सकारात्मता दर 4.57 टक्के आहे. तसेच देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे.

दरम्यान, राज्यात महाराष्ट्रात 2 हजार 40 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला. 2 हजार 48 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने टेन्शन वाढवले आहे. तसेच, मुंबईत शनिवारी 867 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत शनिवारी 486 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11 लाख 07 हजार 419 वर पोहोचली आहे.


हेही वाचा – हर घर तिरंगा मोहीम : भारताचा झेंडा फडकवण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक