घरताज्या घडामोडीराज्यात 1515 नवे रुग्ण, तर 2062 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात 1515 नवे रुग्ण, तर 2062 रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

राज्यासह देशभरात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या (Cornavirus) संख्येत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वबभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच सोमवारी राज्यात 1 हजार 515 कोरोनाच्या (Corona Patients) नव्या रुग्णांची भर पडली आहे.

राज्यासह देशभरात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या (Cornavirus) संख्येत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वबभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच सोमवारी राज्यात 1 हजार 515 कोरोनाच्या (Corona Patients) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच, सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील (Mumbai) आहे. मुंबईत सध्या 431 सक्रिय रुग्ण आहेत. याशिवाय सोमवारी दिवसभरात एकूण 2 हजार 062 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. (new 1515 corona patients in maharashtra)

राज्यात कोरोनामुळे तीन कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला आहे. तसेच, आतापर्यंत राज्यामध्ये 78 लाख 16 हजार 933 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना (Covid 19) रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.87 टक्के इतके झाले आहे. शिवाय, राज्यात आज एकूण 21 हजार 935 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 7 हजार 040 इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यात 4 हजार 605 सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

देशात 16 हजार 135 नवे कोरोना रुग्ण

गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 13 हजार 958 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

- Advertisement -

सध्या भारतात 1 लाख 13 हजार 864 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा सकारात्मकता दर 4.85 इतका आहे.


हेही वाचा – पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत; मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -