राज्यात 1 हजार 600 नवे रुग्ण; तर 1,864 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईसह राज्यभरातील कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत चढ-उतार होत आहेत. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. लसीकरण हे कोरोनावरील जालीम उपाय मानले जात आहे. त्यामुळे लस घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासन व सरकारकडून केले जात आहे.

CORONA PESHANT

मुंबईसह राज्यभरातील कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत चढ-उतार होत आहेत. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. लसीकरण हे कोरोनावरील जालीम उपाय मानले जात आहे. त्यामुळे लस घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासन व सरकारकडून केले जात आहे. अशातच आज राज्यात 1 हजार 600 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच, दिवसभरात एकूण 1 हजार 864 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. (new 1600 corona patients in maharashtra)

गेल्या 24 तासांत राज्यात 5 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79 लाख 41 हजार 458 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.04 टक्के इतके झाले आहे. राज्यात एकूण 10 हजार 633 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4 हजार 257 इतके रुग्ण असून, त्यानंतर ठाण्यामध्ये 2 हजार 380 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत आज 638 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत मंगळवारी 769 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11 लाख 20 हजार 868 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतका झाला आहे.

गेल्या 24 तासांत 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 698 झाली आहे. सध्या मुंबईत 4 हजार 257 रुग्ण आहेत. मुंबईत आढळलेल्या नव्या 638 रुग्णांमध्ये 594 म्हणजे 93 टक्के रुग्णांना अधिक लक्षणे नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा – मंगळवेढा तालुक्यातील गणेश मंदिर परिसरात पुरातत्व विभागाकडून तोडफोड, ऐन गणेशोत्सवात भाविक संतप्त