घरट्रेंडिंगराज्यात 1 हजार 849 नवे कोरोना रूग्ण; तीन बाधितांचा मृत्यू

राज्यात 1 हजार 849 नवे कोरोना रूग्ण; तीन बाधितांचा मृत्यू

Subscribe

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा चांगलीच सक्रीय झाली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वोतोपरी पर्यत्न करत आहे. रविवारी राज्यात 1 हजार 849 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा चांगलीच सक्रीय झाली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वोतोपरी पर्यत्न करत आहे. रविवारी राज्यात 1 हजार 849 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच, तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. (new 1849 corona patients in maharashtra)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 हजार 853 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची रुग्णांची संख्या 78 लाख 86 हजार 348 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के झाले आहे. तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे.

- Advertisement -

देशात 19 हजार 673 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 336 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 43 हजार 676 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात एकूण 5 लाख 36 हजार 357 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत.

महाराष्ट्रात आज बी ए. चार आणि पाच व्हेरीयंटचे 62 रुग्ण आढळून आले. तर बीए.2.75 चे 79 रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

शनिवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात 2 हजार 087 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तसेच, 19 हजार 336 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून 4 कोटी 33 लाख 49 हजार 778 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


हेही वाचा – ईडी मला अटक करणार आहे आणि त्यासाठी मी तयार – संजय राऊत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -