राज्यात 1877 नवे कोरोना रुग्ण, 5 बाधितांचा मृत्यू

गुरूवारी राज्यात 1 हजार 877 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 1971 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

coronavirus 3

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेखात चढ-उतार होत आहेत. राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच, कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण ही मोठ्या प्रमाणात केले जात आहे. अशातच गुरूवारी राज्यात 1 हजार 877 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 1971 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (New 1877 Corona patients in Maharashtra)

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के

गुरुवारी 1 हजार 971 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण 79 लाख 06 हजार 291 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के एवढे झाले आहे. तसेच, 5 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे.

11 हजार 790 सक्रीय रुग्ण

मंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यात सध्या 11 हजार 790 सक्रीय रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुणे, नागपूरमध्ये आहेत. मुंबईमध्ये 3 हजार 818 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 1 हजार 219 सक्रीय रुग्ण आहेत. पुण्यात 2 हजार 417 सक्रीय रुग्ण आहेत.

देशात कोरोनाचे 16 हजार 299 नवीन रुग्ण

देशभरात मागील 24 तासांत कोरोनाचे 16 हजार 299 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 हजार 431 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे 1 लाख 25 हजार 076 सक्रिय रुग्ण आहेत. तर देशाचा पॉझिटिव्हीटी दर 4.58 टक्के इतका आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतात आतापर्यंत 5,26,879 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या आजारातून आतापर्यंत एकूण 4,35,55,041 रुग्ण बरे झाले आहेत.


हेही वाचा – संतापजनक! भाजपाने वाटलेल्या तिरंग्यावर पक्षाचे नाव आणि चिन्ह, सचिन सावंतांनी ट्विट केला व्हिडीओ