घरमहाराष्ट्रपुणेराज्यात बुधवारी 1932 नवे कोरोना रुग्ण, तर 2187 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात बुधवारी 1932 नवे कोरोना रुग्ण, तर 2187 रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

राज्यात कोरोना (Corona) रुग्णवाढीचा आलेखामध्ये चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी 1 हजार 932 नव्या कोरोना (Coronavirus) रुग्णांची भर पडली आहे. राज्यभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळले आहेत.

राज्यात कोरोना (Corona) रुग्णवाढीचा आलेखामध्ये चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी 1 हजार 932 नव्या कोरोना (Coronavirus) रुग्णांची भर पडली आहे. राज्यभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात एकूण 2 हजार 187 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. (New 1932 corona patients in maharashtra)

राज्यात बुधवारी सात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून, राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. राज्यात आतापर्यंत 78 लाख 91 हजार 665 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के इतके झाले आहे.

- Advertisement -

राज्यात एकूण 12 हजार 321 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 3 हजार 530 इतके रुग्ण असूनस त्यानंतर मुंबईमध्ये 2 हजार 106 सक्रिय रुग्ण आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 17 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.

- Advertisement -

सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के

भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 3 हजार 610 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या भारतात 1 लाख 37 हजार 57 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


हेही वाचा – मोठी बातमी! नवी वॉर्ड रचना रद्द, २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणुका होणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -