राज्यात 2024 नवे कोरोना रुग्ण; तर 5 जणांचा मृत्यू

राज्यभरात शुक्रवारी 2 हजार 024 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच, पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्यस्थितीत 11 हजार 906 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यभरात शुक्रवारी 2 हजार 024 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच, पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्यस्थितीत 11 हजार 906 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. याशिवाय, 2 हजार 190 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (New 2024 corona patients in Maharashtra and 5 death)

यासंदर्भात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 2 हजार 190 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78 लाख 95 हजार 954 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.01 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज पाच कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8 कोटी 33 लाख 60 हजार 768 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 80 लाख 55 हजार 989 म्हणजेच 09.66 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

  • राज्यात 11 हजार 906 सक्रीय रुग्ण
  • मुंबई – 2 हजार 391 सक्रीय रुग्ण
  • पुणे – 3 हजार 138 सक्रीय रुग्ण
  • नाशिक – 519 सक्रीय रुग्ण
  • ठाणे – 873
  • नागपूर – 1 हजार 294 रुग्ण

मुंबईत आज 446 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच, पुणे मनपा 254, पिंपरी चिंचवडमध्ये 110 आणि नागपूर मनपामध्ये 112 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

आरोग्य यंत्रणा सतर्क

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख सतत वर-खाली होत आहे. रुग्णांच्या संख्येत होणार वाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांत लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. नागरिकांना लसीकरणासाठी संबंधित यंत्रणांकडून आवाहन केले जात आहे. तसेच, ज्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. त्याना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

साथीच्या आजारांनी डोकं वर काढले

एकिकडे मुंबईत कोरोना वाढतोय तर, दुसरीकडे साथीच्या आजारांनी डोकं वर काढले आहे. स्वाईन फ्यू, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या अनेक साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. तसेच, कोरोना आणि साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर सामजिक अंतर ठेवण्याचे आवाहनही केले जात असून, सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.


हेही वाचा – ‘रडायचं नाही लढायचं’, संजय राऊत यांचे विरोधी पक्षांना पत्र