राज्यात 2 हजार 678 नवे रुग्ण, नागपूरात बी ए. 2.75 व्हेरीयंटचे २० रुग्ण

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच गुरुवारी राज्यात 2 हजार 678 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 238 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

coronavirus cases in india mumbai reports 852 new covid cases seven fatalities maharashtra

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच गुरुवारी राज्यात 2 हजार 678 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 238 जणांनी कोरोनावर (Coronavirus) मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बुधवारच्या तुलनेत गुरूवारी नव्या रुग्णांची संख्या कमी आहे. बुधवारी राज्यात 3142 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. (New 2678 corona patients in maharashtra)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण 78 लाख 28 हजार 352 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.91 टक्के एवढे झाले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृतांचा आकडाही वाढत आहे. राज्यात गुरुवारी 8 कोरोनाबाधित रुग्णांचा (Corona patients) मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर 1.85 टक्के एवढा झाला आहे. बुधवारी राज्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता.

राज्यात सध्या एकूण 19 हजार 413 सक्रिय रुग्ण आहेत. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबई आणि पुण्यातमध्ये आहेत. मुंबईत 4 हजार 875 आणि पुण्यात 6 हजार 79 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाण्यामध्ये 3 हजार 131 सक्रिय रुग्ण आहेत.

बी ए.2.75 व्हेरीयंटचे 20 रुग्ण

नागपूर विभागात बीए.2.75 व्हेरीयंटचे एकूण 20 रुग्ण आढळले आहेत. या बाधितांचे सर्व नमुने 15 जून ते 5 जुलै 2022 या कालावधीत घेण्यात आले होते. यामध्ये 11 पुरुष आणि 9 स्त्रियांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील 17 रुग्णांचे लसीकरण झालेले आहे.

दरम्यान, हे सर्व रुग्ण लक्षण विरहित किंवा सौम्य स्वरूपाचे आहेत. तसेच, आजारातून बरे झाले असून, या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात आढळलेल्या बीए. 2.75 या वेरियंटची संख्या 30 झाली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), नागपूर यांच्या अहवालात माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा – शिवसेनेतील गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंकडून निष्ठा यात्रेची घोषणा, महाराष्ट्र पिंजून काढणार