घरताज्या घडामोडीराज्यात 2 हजार 944 नवे कोरोना रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

राज्यात 2 हजार 944 नवे कोरोना रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच शुक्रवारी राज्यात 2 हजार 944 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच शुक्रवारी राज्यात 2 हजार 944 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच, 7 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे. (New 2944 corona patients in maharashtra)

शुक्रवारी राज्यात 3 हजार 499 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 78 लाख 31 हजार 851 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.91 टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, गुरुवारी राज्यात दोन हजार 678 रुग्णांची तर बुधवारी राज्यात 3142 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

- Advertisement -

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात सध्या 18 हजार 851 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या मुंबई, ठाणे आणि पुण्यात आहे. मुंबईत 4 हजार 427 तर ठाण्यात 2 हजार 829 आणि पुण्यात 6 हजार 197 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

सर्वाधिक रुग्ण

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि पुण्यात आढळले आहेत. मुंबईत आज 530 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर नवी मुंबई 118, पुणे 197, पुणे मनपा 641, पिंपरी चिंचडवड मनपामध्ये 194 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. इतर ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या 100 पेक्षा कमी आहे.

देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या देशात 1 लाख 22 हजार 335 रुग्ण कोरोनो संक्रमित आहेत. तर गुरुवारी दिवसभरात 15 हजार 899 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासह आतापर्यंत भारतात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 29 लाख 37 हजार 876 वर पोहोचली आहे.


हेही वाचा – आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -