घरमहाराष्ट्रमुंबईत शनिवारी 486 नवे रुग्ण, 284 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबईत शनिवारी 486 नवे रुग्ण, 284 रुग्णांची कोरोनावर मात

Subscribe

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख सतत वर-खाली होत आहे. रुग्णांच्या संख्येत होणार वाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच मुंबईत शनिवारी 486 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच, शनिवारी 284 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख सतत वर-खाली होत आहे. रुग्णांच्या संख्येत होणार वाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच मुंबईत शनिवारी 486 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच, शनिवारी 284 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. राज्यात एकूण 11 हजार 875 सक्रिय रुग्ण आहेत. (New 486 corona patients in mumbai and 1931 patients in maharashtra)

मुंबईत शनिवारी 284 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11 लाख 04 हजार 833 वर पोहोचली आहे. तसेच, मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. दरम्यान, राज्यात शनिवारी 1 हजार 931 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात एकूण 1 हजार 953 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

- Advertisement -

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 658 झाली आहे. सध्या मुंबईत 2 हजार 591 रुग्ण आहेत. मुंबईत आढळलेल्या नव्या 486 रुग्णांमध्ये 449 रुग्णांना अधिक लक्षणे नसल्याचे समजते. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 2 हजार 329 दिवसांवर गेला आहे.

मुंबईमध्ये 2 हजार 591 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 3 हजार 036 सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात 934 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 170, रायगड 233, रत्नागिरी 53, सिंधुदुर्ग 56, सातारा 100, सांगली 195, कोल्हापूर 149, सोलापूर 166, नाशिक 485, अहमदनगर 339, जळगाव 51, धुळे 69, औरंगाबाद 201, जालना 54, बीड 62, लातूर 208, परभणी 28, हिंगोली 34, नांदेड 93, उस्मानाबाद 162, अमरावती 124, अकोला 38, वाशिम 118, बुलढाणा 54, यवतमाळ 118, नागपूर 1228, वर्धा 82, भंडारा 293, गोंदिया 132, गडचिरोली 90 आणि चंद्रपूरमध्ये 127 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे.

- Advertisement -

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख सतत वर-खाली होत आहे. रुग्णांच्या संख्येत होणार वाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांत लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. नागरिकांना लसीकरणासाठी संबंधित यंत्रणांकडून आवाहन केले जात आहे. तसेच, ज्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. त्याना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

साथीच्या आजारांनी डोकं वर काढले

एकिकडे मुंबईत कोरोना वाढतोय तर, दुसरीकडे साथीच्या आजारांनी डोकं वर काढले आहे. स्वाईन फ्यू, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या अनेक साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. तसेच, कोरोना आणि साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर सामजिक अंतर ठेवण्याचे आवाहनही केले जात असून, सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.


हेही वाचा – देशाचे नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड; मार्गारेट अल्वा यांचा पराभव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -