Coronavirus Maharashtra: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६९०; आज ५५ रुग्णांची नोंद

corona virus
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यामध्ये रविवारी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत ५५ जणांची वाढ झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६९० वर पोहचला आहे. तर रविवारी चार रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५६ वर पोहचला आहे.

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रविवारी दुपारी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत ५५ जणांची वाढ झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६९० वर पोहचला आहे. यामध्ये मुंबईमध्ये २९, पुणे १७, पिंपरी चिंचवड ४, अहमदनगर ३, औरंगाबाद २ असे ५५ रुग्ण आहेत.

एकीकडे वेगाने रुग्ण वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी बरे होत असलेले रुग्ण हे दिलासादायक चित्र आहे. रविवारी चार रूग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत तब्बल ५६ रुग्णांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे.