Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी राज्यात 550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 3 जणांचा मृत्यू

राज्यात 550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 3 जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. अशातच राज्यात गुरूवारी 550 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. अशातच राज्यात गुरूवारी 550 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. गुरूवारी राज्यात 755 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. दिलासादायक बाब म्हणजे नव्या कोरोना रूग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त आहे. (New 550 corona patients in Maharashtra 3 death)

राज्यात गुरूवारी 740 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आजपर्यंत 79 लाख 65 हजार 395 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्के एवढे झाले आहे. तसेच, राज्यात 3 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.

- Advertisement -

राज्यात सध्या 3 हजार 857 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णाचे प्रमाण मुंबई, ठाणे आणि पुण्यात आहे. मुंबईमध्ये सध्या 805 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात एक हजार 1194 सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यामध्ये 511 सक्रीय रुग्ण आहेत. रायगड 214, नाशिक 124 आणि नागपूरमध्ये 147 सक्रिय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी 100 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. परभणीमध्ये सर्वात कमी दोन सक्रिय रुग्ण आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 98 नवे रुग्ण आढळले आहेत. तर पुणे मनपामध्ये 97 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, मुंबई सर्कलमध्ये आज 218 नवे रुग्ण आढळले आहेत. नाशिक सर्कलमध्ये 42, पुणे सर्कलमध्ये 177, कोल्हापूर सर्कल 28, औरंगाबाद सर्कल सात, लातूर सर्कल 23, अकोला सर्कल 22 आणि नागपूर सर्कलमध्ये 33 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – सरसंघचालक मोहन भागवतांचा उल्लेख ‘राष्ट्र ऋषी’; इमाम उमर इलियासी यांच्याकडून प्रशंसा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -