घरताज्या घडामोडीराज्यात शनिवारी 631 नवे रुग्ण; तीन बाधितांचा मृत्यू

राज्यात शनिवारी 631 नवे रुग्ण; तीन बाधितांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळत आहे. अशातच शनिवारी राज्यात 631 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूची नोंद आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळत आहे. अशातच शनिवारी राज्यात 631 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूची नोंद आहे. शनिवारी राज्यात 789 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (New 631 corona patients in Maharashtra and 3 death)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 789 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 79 लाख 62 हजार 71 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.12 टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -

गुरुवारी राज्यात 755 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली होती. शुक्रवारी राज्यात 697 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली होती. तर दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी राज्यात 631 नव्या रुग्णाची नोंद झाली असून, तीन कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के इतका आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,45,15,789 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 81,14,940 म्हणजेच 09.60 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा आलेख घसरत असल्याचे दिसत आहे. दिवसागणिक दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्यामध्ये घट होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे.

- Advertisement -

राज्यात सध्या 4 हजार 562 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई आणि पुण्यात आहेत. मुंबईमध्ये सध्या 1 हजार 154 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 1 हजार 161 सक्रीय रुग्णांची संख्या आहे. त्याशिवाय ठाण्यात 812 सक्रीय रुग्णांची संख्या आहे.


हेही वाचा – प्रकल्प गुजरातला पळवला, महाराष्ट्र पाकिस्तान आहे का?; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -