घरताज्या घडामोडीराज्यात कोरोनाचे संकट वाढलं; सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार पार

राज्यात कोरोनाचे संकट वाढलं; सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार पार

Subscribe

मागील काही महिन्यांपूर्वी कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या वाढ होत असतानाच सक्रिय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या वाढ होत असतानाच सक्रिय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनाच्या सक्रीय रूग्णांची संख्या ३०१६ एवढी झाली आहे. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये १८४ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. (New 694 Corona Cases In Maharashtra Today No Covid Death)

- Advertisement -

रूग्ण बरं होण्याचा दर ९८.१४ टक्के एवढा आहे. रोज कोरोनांच्या रूग्णांमध्ये मोठी भर पडत असल्याने राज्यासाठी धोक्याची घंटा आहे.

दरम्यान, दिल्ली वगळता महाराष्ट्र, केरळ आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रूग्ण असलेले जिल्हे आहेत. तर केरळच्या वायनाडमध्ये कोविड पॉझिटिव्ह दर 14.8 टक्के आहे. तसेच, कोट्टायममध्ये 10.5 टक्के आहे. त्याचप्रमाणे सांगलीमध्ये 14.6 टक्के आणि पुण्यात 11.1 टक्के सकारात्मकता दर आहे. गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात 10.7 टक्के सकारात्मकता दर आहे.

- Advertisement -

‘कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे, परंतु दिलासादायक बाब ही आहे की परिस्थिती इतकी बिघडलेली नाही. देशभरातील रुग्णालयांमध्ये अद्याप ोकोविड रुग्णांची गर्दी दिसत नाही’, असे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नॅशनल कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितले.

मुंबईकरांनो सावधान व्हा. कारण पुढचे दोन महिने कोरोना वाढणार आहे.एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत कोरोना वाढणार असा अंदाज मुंबई महापालिकेने व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आली असून पालिका रुग्णालयांत 4 हजार बेड्स अ‍ॅक्टिव्ह करण्यात आले आहेत.


हेही वाचा – SCच्या तिखट टिप्पणीनंतर शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा दणका; आमदर निधी वाटपाला स्थगिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -