घरताज्या घडामोडीCoronavirus: राज्यात करोनाचे ८ नवे रुग्ण; करोनाग्रस्तांची संख्या ८९ वरुन ९७ वर

Coronavirus: राज्यात करोनाचे ८ नवे रुग्ण; करोनाग्रस्तांची संख्या ८९ वरुन ९७ वर

Subscribe

राज्यात नवे ८ रुग्ण आढल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. दिवसागणिक करोनाबाधीतांची संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात करोनाटे ८ नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईचे ३, सातारा १ आणि सांगलीचे ४ रुग्ण आहेत. यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून ८९ वरुन ९७ वर गेला आहे. हज यात्रेवरुन आलेल्या सांगलीच्या चौघांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. या सर्वांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


हेही वाचा – राज्यात आतापासून संचारबंदी लागू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

करोना राज्यात वेगाने पसरत आहे. राज्य करोनाच्या तीसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. यामुळे राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. यासह प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसेच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राज्यात २४ तासांमध्ये करोनाचे २४ रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -