कृषी कायद्यांवर मंत्रालयात चर्चा; मंत्रिमंडळ उपसमितीची आज दुपारी बैठक

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीची आज दुपारी बैठक होणार असून या बैठकीत कृषी कायद्यातील त्रुटी, उणिवांवर चर्चा होणार आहे.

new agriculture act will be discussed by maharashtra govt cabinet sub committee meeting today

केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात गेले २२ दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू बाईकवरुन रॅली काढत दिल्लीला पोहोचले. दिल्ली गाठत त्यांनी शेतकरी आंदोलकांशी संवाद साधला. त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी आज (गुरुवारी) दुपारी दोन वाजता मंत्रालयात मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. या बठकीमध्ये अधिनियमांतील त्रुटी आणि उणिवांवर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, आज शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

राज्यात कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी या कायद्यांमधील त्रुटी आणि उणिवांवर चर्चा होणार आहे. यासाठी आज मंत्रिमंडळ उपसमितीची दुपारी दोन वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. टी आणि उणिवांबाबत अभ्यास करणाऱ्या उपसमितीसोबत आज मंत्रालयात खलबंत होणार आहेत. त्यामुळे राज्यात कृषी कायद्यांची अंमलबजावणी करणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा पुढाकार

दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकरी मागे हटायला तयार नाही आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि काही शेतकरी संघटनांमधील वाद मिटविण्यासाठी समिती स्थापन करण्याची सूचना दिली आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालय आज शेतकरी संघटनांची बाजू ऐकून घेणार आहे. आज १२ वाजता सुनावणी होणार आहे.


हेही वाचा – शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी