Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम 'खून का बदला खून'; नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येचा उलगडा; आरोपी अटकेत

‘खून का बदला खून’; नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येचा उलगडा; आरोपी अटकेत

Subscribe

नवी मुंबईः नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर-६ परिसरात इम्पिरिया गृहसमुहाचे भागीदार सवजीभाई गोकर मंजेरी यांची १५ मार्च रोजी अज्ञात इसमांकडून गोळया झाडून हत्या करण्यात आली होती.या हत्येचा छडा लावण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. सीसीटिव्ही व गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनाच्या आधारे पोलिसांनी मंजेरी यांच्या हत्येतील एका प्रमुख आरोपीला गुजरात तर तिघांना बिहार येथून अटक केली आहे. अंतर्गत वादातून मंजेरी यांची हत्या झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

मंजेरी यांच्या हत्येचा कट रचणारा आरोपी मेहेक जयरामभाई नारीया (वय २८) रा.राजकोट गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. तर मंजेरी यांच्यावर गोळया झाडणारे बिहारचे रहिवासी कौशल कुमार विजेदर यादव (वय १८), गौरवकुमार विकास यादव (वय २४), सोनूकुमार विजेदर यादव (वय २३) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

त्याने दिलेल्या माहितीनुसार नारीया यांचे निकटवर्तीय बचूभाई धना पटणी यांचा १९९८ साली सवजीभाई गोकर मंजेरी यांनी खून केला होता.तसेच नोव्हेंबर २०२२ मध्ये मंजेरी यांनी नातेवाईकांना काही इसमाच्या माध्यमातून भरचौकात मारहाण करावयास लावले होते. याचा रागमनात धरुन मुंबईतील साथीदारांच्या आधारावर मंजेरी यांच्यावर पाळत ठेवली. बिहार येथील मारेकरुंच्या मदतीने आरोपी मेहेक जयरामभाई नारीया याने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणचा आणखी काही साथीदार सहभागी असून पोलिस त्यांच्या शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. या आरोपींना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचा तपास नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे , सहपोलिस आयुक्त संजय मोहिते, अप्पर पोलिस आयुक्त महेश घुर्ये यांच्या सूचनेप्रमाणे परिमंडळ-१, वाशीचे उपायुक्त विवेक पानसरे, तुर्भे विभाग सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत व तुर्भे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर, पोलिस निरीक्षक महेश पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि.सचिन ढगे, सत्यवान बिले यांच्यासह पथकाने केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -