घरताज्या घडामोडीपोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल केंद्रात, CISFचे नवे महासंचालक

पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल केंद्रात, CISFचे नवे महासंचालक

Subscribe

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश बुधवारी रात्री उशीरा काढले आहेत. १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या जयस्वाल यांनी राज्यात येण्याआधी गेली दहा वर्षे केंद्रातील रिसर्च अण्ड अनलिसीस विंग अर्थात ’रॉ’ या देशातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गुप्तचर संस्थेत काम केले होते. त्यानंतर ते जून २०१८ मध्ये राज्यात परत आले होते. यांच्याकडे मुंबई पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, तेलगी स्टॅम्प घोटाळा अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचा तपास जयस्वाल यांनी केला आहे.

सुबोध जयस्वाल यांनी राज्य सरकारकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून मुक्त करण्याची विनंती केली होती. तसेच केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर जाण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली होती. पोलिस दलाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना राज्य सरकार विचारात घेत नसल्याने सुबोध जयस्वाल नाराज होते. राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर जयस्वाल यांचे सरकारशी फारसे सलोख्याचे संबंध राहिले नाहीत. बदल्या, नियुक्त्या, पुनर्नियुक्त्या आणि इतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्याला डावलले जात असल्याची भावना जयस्वाल यांनी खासगीत बोलून दाखवली होती. याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने त्यांनी महाराष्ट्र सोडून पुन्हा केंद्रात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. याबाबत त्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वीच राज्यातील प्रमुखांकडे पत्रव्यवहार केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – सरपंचपदाच्या बोलीची चौकशी करावी – हसन मुश्रीफ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -