घरउत्तर महाराष्ट्रनवे आयुक्त : कोण आहेत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ?

नवे आयुक्त : कोण आहेत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ?

Subscribe

नाशिक : महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची शासनाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी नियुक्ती केली आहे.

डॉ. पुलकुंडवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी आहेत. रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संचालक म्हणून ते काम बघत होते. समृध्दी महामार्गांसाठीची भूसंपादन प्रक्रिया त्यांनी मोठ्या कौशल्याने हातळली. ते २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी, पुनर्विकास अधिकारी म्हणून, मेळघाट येथे उपविभागीय अधिकारी, कृष्णा खोरे प्रकल्पात विशेष भूसंपादन अधिकारी, नांदेडमध्ये निवासी जिल्हाधिकारी, परभणीत उपविभागीय अधिकारी, अंधेरीत एमआयडीसीचे उपमहाव्यवस्थापक म्हणून काम बघितले. २००८ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे खासगी सचिव म्हणून, त्यानंतर तत्कालीन आरोग्य मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले. प्रशासनाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -