घरमहाराष्ट्रपुणेकरांनो सावधान! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आढळले अजून तीन रुग्ण

पुणेकरांनो सावधान! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आढळले अजून तीन रुग्ण

Subscribe

राज्यात एकीकडे कोरोना आटोक्यात येत असताना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने चिंता वाढवली आहे. पुण्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे अजून तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता मुंबईपाठोपाठ पुण्याची देखील चिंता वाढली आहे. याआधी ८ रुग्ण आढळले होते. यामध्ये पुण्यातील १ रुग्ण होता. दरम्यान, आता नव्याने ३ रुग्ण आढळल्याने पुण्यातील नव्या स्ट्रेनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता ४ वर पोहोचली आहे. तर राज्यातील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे लग्न झालेल्या रुग्णांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आल्यानंतर राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा खंडित करण्यात आली आहे. मात्र, त्याआधी जे प्रवासी परदेशातून आले त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. त्यांची चाचणी केली असता सुरुवातीला ८ जणांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला. यामध्ये मुंबईचे ५ आणि पुणे, ठाणे, मीरा-भाईंदर प्रत्येकी १-१ रुग्ण आढळले. दरम्यान, गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये नव्याने ३ रुग्ण आढळल्याने नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे. तर देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या ७१ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात गुरुवारी ३,७२९ नवे रुग्ण आढळले आहेत तर ३,३५०  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता एकूण ५१,१११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १९,५८,२८२ जणांना कोरोनाची लग्न झाली आहे. १८,५६,१०९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९४.७८ टक्के आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ४९,८९७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर २.५५ टक्के आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -