Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा नवा म्युटंट नाही; राज्य सरकारची माहिती

राज्यात कोरोनाचा नवा म्युटंट नाही; राज्य सरकारची माहिती

Related Story

- Advertisement -

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाचा नवा विषाणू महाराष्ट्रात सापडलेला नाही. मात्र, राज्य सरकारने नव्या विषाणूविरुद्ध लढण्यासाठीची तयारी केली असून आवश्यकता असेल तेव्हा योग्य ते निर्णय घेतले जातील, अशी माहिती राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसात ब्रिटनमधील परत आलेल्यांपैकी आतापर्यंत ३० जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. नवा विषाणू अद्याप कोणामध्ये सापडलेला नाही,” असं महाराष्ट्र सर्विलन्स ऑफिसर, एपिडिमियोलॉजी विभागाचे (ईडी) डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं.

तथापि, राज्याने कोविड-१९ संदर्भात मार्गदर्शक तत्वे राज्यभर कठोरपणे राबवली जात आहे. कोरोनाच्यासंदर्भात जी काही काळजी घ्यायची आहे, त्यासंबंधीत काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विषाणूचा नवीन स्ट्रेन वेगाने पसरत असल्याचे म्हटलं जात असलं तरी काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. सर्वांनी सरकारच्या संबंधित एसओपीचं पालन केलंच पाहिजे,” असं डॉ. आवटे यांनी म्हटलं. ब्रिटनमधून आलेली १७ उड्डाणांमधील तब्बल १ हजार ४६९ प्रवाशांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. या पैकी ७६२ प्रवाशांना मुंबईत अलग ठेवण्यात आलं आहे, तर इतर ७०० जणांना इतर राज्यात पाठवण्यात आलं, अशी माहिती एका नागरी अधिकाऱ्याने दिली.

- Advertisement -

“आमच्याकडे यूके किंवा मध्यपूर्वेहून येणार्‍या किंवा गेल्या काही महिन्यात यूके किंवा मध्य-पूर्वेकडील देशांतून प्रवास करणारे लोक शोधण्यासाठी एक विस्तृत प्रणाली आहे. त्यांचे सर्व तपशील आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नाही, असं अधिकाऱ्याने सांगितलं. २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटन-मध्य-पूर्वेकडून परत आलेल्या सर्व लोकांच्या व्यापक सर्वेक्षण करण्याचे आदेश महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २३ डिसेंबर दिले आहेत.

 

- Advertisement -