घरताज्या घडामोडीचीनमध्ये करोनाग्रस्ताचा आकडा शून्य, पण सेकंड वेव्हचा धोका कायम

चीनमध्ये करोनाग्रस्ताचा आकडा शून्य, पण सेकंड वेव्हचा धोका कायम

Subscribe

चीनमध्ये अनेक शर्थीच्या प्रयत्नानंतर करोनाची लागण झालेल्या नव्या केसेसचा आकडा आता शून्य झाला आहे. पहिल्यांदाच चीनअंतर्गत हा आकडा शून्यावर आला आहे. चीनमध्ये करोनाचा केंद्रबिंदू असलेल्या वुहानमध्ये आता कोणताही नवीन रूग्ण नाही असे चीन सरकारमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. चीनमध्ये हा डिसेंबरपासून करोनाग्रस्तांचे आकडे समोर येऊ लागले होते. पण आता देशाअंतर्गत नवा आकडा शून्य झाला असल्याचे चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने जाहीर केले आहे.

वुहानमध्ये एकुण १ कोटी १० लाख लोकांना २३ जानेवारीपासून क्वारंटाईन करण्यात आले होते. तर ४ कोटी लोकांना हुबेई प्रांतात लॉकडाऊन करण्यात आले होते. तर उर्वरीत चीनमध्ये लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यापासून मज्जाव करण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. चीनमध्ये हुबेई प्रांतात झालेल्या ८ मृत्यूमुळे एकुण मृतांची संख्या ही ३२४५ इतकी पोहचली आहे. चीनमध्ये ८१ हजार जणांना करोनाची लागण झाली होती. तर ७२६३ लोक हे करोनामुळे आजारी पडले होते. सद्यस्थितीला जगभरात २ लाखांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर जगभरात ८७०० इतक्या लोकांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या आठवड्यात १० मार्चला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे जाहीर केले होते. चीनमध्ये आता संपुर्ण जनजीवन पूर्ववत झाले आहे. तर लोकही कामावर, फॅक्टरीत परत येऊ लागले आहेत. तर शाळा आणि कॉलेजेसही पूर्ववत व्हायला सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

हुबेईतील यंत्रणांनी घोषणा केल्यानुसार आता काही प्रमाणात याठिकाणच्या सीमा खुल्या करण्यात येत आहेत. ज्याठिकाणी करोनाचा धोका कमी आहे अशा लो रिस्क भागामधून लोकांना आता आपल्या नोकरीसाठी किंवा घराच्या ठिकाणी जाण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.

 

- Advertisement -

सेंकड व्हेव्हचा धोका

चीनमध्ये देशांतर्गत धोका कमी झालेला असला तरीही चीनला देशाबाहेरून येणाऱ्या प्रवाशांचा मोठा धोका आहे. चीनमध्ये दररोज २० हजार लोक प्रवास करत आहेत. बिजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता १४ दिवसासाठी हॉटेलमध्ये क्वारनटाइन करण्यात येत आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनच्या आकडेवारीनुसार ३४ केसेसमध्ये परदेशातून आलेल्या रूग्णांची संख्या वाढून १८९ पर्यंत वाढली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -