घरमहाराष्ट्रचिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार,नितेश राणेंचा दावा

चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार,नितेश राणेंचा दावा

Subscribe

राज्याअंतर्गत अनेक राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्याने आता महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता टाळता येत नाहीये. दरम्यान पक्षांतर्गत कुरघोडी,नाराजी, मान-अपमानाचे हे नाराजी नाट्य सुरु असताना आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ 40 आमदार असल्याने आता भाजपसोबत पुन्हा एकदा सेना घरोबा स्थापन करतोय का?, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सेनेचे कट्टर विरोधक मानले जाणारे नितेश राणे (nitesh rane) कसे शांत बसणार, त्यांनी देखील या नाट्यपूर्ण घडामोडीवर सेनेवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.(New government will come in Maharashtra, claims Nitesh Rane)

नितेश राणेंच ट्विट

नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यामध्ये नवे सरकार येणार असा दावा केला आहे. तसेच राऊतांवर देखील त्यांनी टीका केलीये. “संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय?;सरकार वाचविण्यासाठी?;चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार,विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार !” अशा प्रकारचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय.

- Advertisement -

विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट सुरत गाठलं. यानंतर त्यांच्यासोबत आता 40 आमदार आहेत अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना दिलीये. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांची शिवसेनेच्या गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याने त्यांचा बंड अधीक तीव्र झाला. राष्ट्रवादी- काँग्रेस सोबतचा संसार आता त्यांना मान्य नसल्याचं एकंदरीत त्यांनी सांगितलं आहे. तसचे शिवसेना पक्ष, हिंदुत्व यांच्याशी ते एकनिष्ठ असून त्यांना शिवसेनेचे सध्याचे नेतृत्व असलेले उद्धव ठाकरे यांची भूमिका मान्य नाही असं त्यांच्या भूमिकेवरुन दिसून येतय.

- Advertisement -
रॅडिसन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसह 40 आमदार

आसाममधील गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे आणि पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आहेत. ही संख्या ४० असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी शिंदे स्वत: राज्यपालांना भेटण्यास जाण्याची शक्यता आहे.


हे ही वाचा –   विधानसभा बरखास्तीच्या दिशेने.., खासदार संजय राऊतांचे संकेत

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -